पालिकेच्या “दप्तर” दिरंगाईबाबत आदित्य ठाकरे यांनी उत्तर द्यावे- आशिष शेलार

101

शाळां सुरु झाल्या पण मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य निवेदेतच अडकले आहे. एरवी श्रेय घेण्यासाठी धावणारे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या “दप्तर” दिरंगाईचे उत्तर द्यावे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विषयाकडे लक्ष वेधले.

मुंबई महापालिकेतर्फे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या,पेन्सिल, रेनकोटसह विविध 27 वस्तू देण्यात येतात पण निविदाच मंजूर न झाल्याने साहित्य आता पोहचायला ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे, तर दप्तर सप्टेंबरमध्येच मिळेल असा कयास आहे.

तर विद्यार्थ्यांसाठी भाजप लढणार

महापालिका शाळा इंग्रजी माध्यमाच्या करून एकिकडे “पब्लिक स्कूल” नावाने युवराजांच्या प्रसिद्धीची “आतिषबाजी”तर दुसरीकडे गरिब विद्यार्थ्यांना म्हणणार रेनकोट, पाटी, पेन्सिल, दप्तराशिवाय वर्गात बसा..हा सगळा कारभार म्हणजे
बडा घर पोकळ वासा, असे दुर्दैवाने म्हणावे लागते असेही आमदार अँड आशिष शेलार म्हणाले. खर तर शाळा सुरु झाल्या त्याच आठवडाभरात हे साहित्य विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते. पण अद्याप टेंडरच मंजूर झाले नाही. काही वाटाघाटी बाकी आहेत का? विद्यार्थ्यांनी दप्तर, पेन, पेन्सिल शिवाय शाळेत जायचे का? त्यामुळे येत्या सात दिवसात जर हे साहित्य उपलब्ध झाले नाही तर विद्यार्थींसाठी भाजपा लढेल, असा इशारा ही आमदार अँड आशिष शेलार यांनी दिला.

( हेही वाचा: राज्यसभेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिवसेनेची सावध भूमिका, एक दिवस आधीच आमदारांना बोलावले मुंबईत )

आता एका भेटीने काय होणार?

आता पावसाला सुरुवात झाल्यावर एका मिलन सबवेला भेट देऊन काय होणार? नालेसफाईची कामे वेळीच सुरु व्हावीत आणि पुर्ण व्हावी म्हणून शिवसेनेने कोणत्याही प्रकारे प्रयत्न केले नाहीत. भाजपाने नालेसफाईचा पाठपुरावा केला त्यामुळे टेंडर निघाले, कामांना सुरुवात झाली. आता एक भेट देऊन काय उपयोग? असा सवाल आमदार अँड आशिष शेलार यांनी केला. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी मिलन सबवेला दिलेल्या भेटीबाबत शेलारांनी ही प्रतिक्रिया दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.