“राऊत माफी मागा अन्यथा…”, आता सोमय्यांच्या पत्नीची नोटीस

103

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप केला होता. राऊत सोमयांविरोधात आक्रमक झाले असून सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा टॉयलेट घोटळा लवकरच बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी राऊतांनी पुरावा म्हणून एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. यावर सोमय्यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. दरम्यान, आता किरीट सोमय्यांनी त्याला प्रतिउत्तर दिले आहे.

राऊतांनी माफी मागावी अन्यथा…

राऊतांना सोमय्यांनी प्रत्युत्तर देताना आरोप करत थेट मानहानीची नोटीस पाठवली आहे. इतकेच नाही तर टॉयलेट घोटाळ्यातील आरोपांवर राऊतांनी ४८ तासांत माफी मागावी, कारण त्यांनी मेधा सोमय्या यांचे चरित्र हनन केले आहे. मागचे २० दिवस झाले एकही कागद न देता राऊत आरोप करत आहेत. संजय राऊत उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत. संजय राऊतांनी माफी मागावी अन्यथा IPC ५००, ५०१आणि ५०६ वरुन कारवाई करावी लागेल. सोमय्यांनी ४८ तासांचा अल्टिमेटम देत आमची लढाई भ्रष्टाचाराविरोधी आहे. या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल करू असेही म्हटले आहे.

(हेही वाचा – मुंबई-पुण्यात CBI चे आठ छापे! व्यवसायिक विनोद गोयंकांसह अविनाश भोसलेंची झडती)

सोमय्यांकडून राऊतांना डेफिमेशनची नोटीस

उद्धव ठाकरे यांचे सरकार घोटाळेबाज आहे. राऊतांना माफी मागावीच लागेल. एका पाठोपाठ एक आरोप राऊत करत आहेत. आता त्यांना धडा शिकवणार संजय राऊतांना डेफिमेशनची नोटीस दिली आहे. ४८ तासात त्यांनी माफी मागावी लागेल असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

असे केले राऊतांनी आरोप

मिरा भाईंदर महापालिकेसह राज्यातील इतर भागात १०० कोटी रूपयांपेक्षा जास्त घोटाळा झाला आहे. यामध्ये किरीट सोमय्यांचा सहभाग आहे, असे आरोप संजय राऊत यांनी केले होते. त्यावर सोमय्यांनी असे म्हटले, धडा शिकवण्यासाठी संजय राऊत यांना माफी मागावीच लागेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.