…तेव्हा सरकारची पळता भुई थोडी करू, पडळकरांचा इशारा

98

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारला इशारा देत पडळकर असे म्हणाले की, आम्ही जेव्हा पुन्हा बैलगाडी शर्यतीच्या विषयात मैदानात उतरु तेव्हा सरकारची पळता भुई थोडी करू. यावेळी, पशु संवर्धन मंत्री सुनीर केदार यांनी 24 ऑगस्ट रोजी एका महिन्यात बैलगाडी शर्यत सुरू करणार अशी घोषणा केली होती, मात्र आता डिसेंबर सुरू झाले असून बैलगाडी शर्यत सुरू करण्यात आली नाही. मग ही बैठक फक्त राजकारणासाठी होती का? असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला आहे. इतकेच नाही तर बैलगाडी शर्यतीच्या विषयामध्ये सरकारने ताबडतोब लक्ष घालावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

सरकारने पोलीस बळाचा वापर करू नये

जेव्हा आम्ही पुन्हा बैलगाडी शर्यतीच्या विषयात मैदानात उतरु तेव्हा सरकारची पळता भुई थोडी करु केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा सरकारने पोलीस बळाचा वापर करण्याचे उद्योग करु नयेत, असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. ते सांगलीच्या आटपाडी मध्ये बोलत होते.

(हेही वाचा – नाशिक नव्हे ‘शूर्पणनखा नगरी’! विद्रोही साहित्य संमेलनात कोकटेंचा जावईशोध)

‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भावना समजून घ्या’

बैलगाडी शर्यती सुरू करण्याच्या मागणीच्या बाबतीत महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांची भावना समजून घेणे गरजेचे आहे. 2012 पासून बैलगाडी शर्यती बंद झाल्या, गोवंश जपला पाहिजे गोवंशाचे संवर्धन झालं पाहिजे खिलार गाई नष्ट व्हायला लागली आहेत. बैलांची संख्या जवळजवळ 50 ते 60 टक्के घटली आहे, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले. दरम्यान, झरे गावामध्ये 20 ऑगस्टला आम्ही बैलगाडी शर्यती आयोजित केल्या होत्या. आम्ही शर्यती घेतल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आणि 24 ऑगस्टला मंत्रालयात अनेक मंत्री आणि अनेक बैलगाडी चालक-मालक संघटनच्या बैठक झाली.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.