Madhya Pradesh Election : मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना तिकीट केव्हा मिळणार?

57
Madhya Pradesh Election : मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना तिकीट केव्हा मिळणार?
Madhya Pradesh Election : मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना तिकीट केव्हा मिळणार?

मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांचे नाव भाजपने जाहीर केलेल्या आतापर्यंतच्या तीन याद्यातील ७९ नावांमध्ये नसल्यामुळे राजधानीत विविध प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे. असं म्हटलं जातयं की भारतीय जनता पक्ष शिवराज सिंह यांचे महत्व राजकीय दृष्ट्या कमी करण्यासाठी त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू इच्छित नसल्याची चर्चा राजधानीत चांगलीच रंगली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश निवडणूकीचे तिकीट मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना केव्हा मिळणार?, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चीला जातोय.

शिवाय भाजप नेत्यांच्या मते केंद्रीय मंत्री आणि खासदारांना यापूर्वी देखील विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरविले आहे. तसेच २०१९ मध्ये माजी खासदार सुमित्रा महाजन यांच्यासोबत देखील असेच करण्यात आले होते. त्यांचे नाव देखील एकाही यादी मध्ये समाविष्ट करण्यात आले न्हवते. त्यांनी पक्ष नेतृत्वाला पत्र लिहून आठवण देखील करून दिली होती. मात्र त्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. असाच काहीसा प्रकार गुजरातमध्ये देखील घडला होता.

(हेही वाचा – Ind vs Aus 3rd ODI : ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चोपले)

भाजपने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात एकच नाव आहे. अमरवाडा मतदारसंघातून पक्षाने ३३ वर्षीय मोनिका बत्ती यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मध्य प्रदेश भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. मोनिकांनी सात दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या आधी ऑल इंडिया गोंडवाना रिपब्लिक पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा होत्या. मोनिका या माजी आमदार मनमोहन शाह बत्ती यांच्या कन्या आहेत.

याआधी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी सायंकाळी जाहीर केली. त्यात ३९ उमेदवारांची नावे आहेत. विशेष म्हणजे या यादीत तीन केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना तिकीट देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्र्यांमध्ये मुरेनाच्या दिमानी मतदारसंघातून नरेंद्र सिंह तोमर, नरसिंगपूरमधून प्रल्हाद पटेल आणि निवासमधून फग्गनसिंग कुलस्ते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक १ मधून तिकीट देण्यात आले आहे. १७ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या पहिल्या यादीतही भाजपने ३९ नावांची घोषणा केली होती, त्यामुळे हा ३९ चा आकडा चर्चेत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.