BJP vs Congress : भाजप-काँग्रेसमध्ये तीन राज्यांत अटीतटीची लढत

राजस्थान आणि मध्यप्रदेशची सत्ता मिळाली तर भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल? हा जसा प्रश्न अनुत्तरीत आहे तसेच राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्ता कायम ठेवली तर मुख्यमंत्री कोण होईल? हा प्रश्न कायम आहे.

91
Lok Sabha Election 2024 : तेलंगणात भाजपा-काँग्रेस आक्रमक, बीआरएसपुढे अस्तित्वाचा प्रश्न
  • वंदना बर्वे

लोकसभा निवडणुकीचा अंतिमपूर्व सामना समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा शंखनाद मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सोमवारी (०९ ऑक्टोबर) रोजी केला आहे. यातील तीन राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होणे निश्चित आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशची सत्ता मिळाली तर भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल? हा जसा प्रश्न अनुत्तरीत आहे तसेच राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्ता कायम ठेवली तर मुख्यमंत्री कोण होईल? हा प्रश्न कायम आहे. (BJP vs Congress)

मध्यप्रदेश

केंद्रीय गृहमंत्री आणि मायक्रो-मॅनेजमेंटचे गुरू अमित शहा यांनी मध्यप्रदेश निवडणुकीची धुरा आपल्या हाती घेतली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी सहप्रभारी म्हणून राज्यात तळ ठोकून बसले आहेत. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह तीन मंत्री आणि सात खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की मध्यप्रदेशात निवडणुकीचे वातावरण कसे असेल?

तसं बघितलं तर, भाजप आणि काँग्रेसमध्ये रोमांचक सामना होण्याची सर्वाधिक शक्यता आहे ती याच राज्यात. येथे १६ व्या विधानसभेसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपपेक्षा सहा आमदार जास्त जिंकून काँग्रेसने मध्यप्रदेशात सत्ता स्थापन केली होती. मात्र, वर्षभरानंत केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केली आणि तत्कालिन मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार कोसळले. यानंतर शिवराजसिंग चौहान यांनी पुन्हा एकदा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. (BJP vs Congress)

परंतु, भाजपने या निवडणुकीत शिवराजसिंग चौहान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तर बनविले नाहीच; उलट चौहान यांचे कट्टर राजकीय विरोधक कैलाश विजयवर्गिय यांना तिकीट दिले. एवढेच नव्हे तर, नरेंद्रसिंग तोमर यांच्यासह तीन केंद्रीय मंत्री आणि सात खासदारांना रणांगनात उतरविले आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी केंद्रीय मंत्री, खासदार आणि पक्षाच्या महासचिवांना मैदानात उतरवावे लागत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की मुकाबला काट्याचा आहे. २३० सदस्यांच्या निवडणुकीत एक एक आमदार किती महत्वाचा आहे हे भाजपची उमेदवारांची यादी बघून स्पष्ट होते.

काँग्रेसने यापूर्वीच्या अर्थात २०१८ मधील विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला धूळ चारली होती. यामुळे भाजपला सत्ताच्यूत करणे फारसे अवघड नाही असे काँग्रेसला वाटत आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या हातात राज्याची धुरा दिली आहे. २०१८ च्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना आहे. (BJP vs Congress)

राजस्थान

भारतीय जनता पक्षाचं बीपी कुणी वाढविलं असेल तर योध्यांची भूमि राजस्थाननं. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. अशोक गहलोत मुख्यमंत्रीपदी आहेत. दर पाच वर्षांनी सत्ताबदल होण्याचा या राज्याचा इतिहास आहे. यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या तमाम नेत्यांची झोप राजस्थाननं उडविली आहे.

भाजपनं राजस्थानमध्ये सुध्दा केंद्रीय मंत्री आणि खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरविलं आहे. निवडणुकीची धुरा दस्तुरखुद्य भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या होती ठेवली आहे. २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसने छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यांत भाजपचा पराभव केला होता. मात्र, आता भाजपला सत्ता मिळण्याची पूर्ण आशा आहे. भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी या तीन मुद्यांवर भाजपने काँग्रेसची झोप उडवून ठेवली आहे. परंतु, माजी मुख्यमत्री वसुंधरा राजे यांना स्वत:ची उपेक्षा होत असल्याचे शल्य आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमनसिंग यांच्या नावाची घोषण झाली आहे. मात्र, वसुंधरा राजे यांना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. यामुळे अंतर्गत कलह उफाळून येणार नाही याची खास काळजी घेतली जात आहे. राजस्थान काँग्रेसमध्ये सध्या सगळं काही शांत-शांत दिसत आहे. मात्र, ही शांतता वादळापूर्वीची असू शकते. काँग्रेस नेते सचिन पायलट कधी काय करतील याचा नेम नाही. पायलट यांच्या मनातील लाव्हा फुटून बाहेर येऊ नये म्हणून काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर न करता निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये सर्वात महत्वाची बाब अशी की, दर पाच वर्षांनी सत्ता बदल घडवून आणण्याची परंपरा राजस्थानवासी यावेळी कायम ठेवतात की नाही? (BJP vs Congress)

(हेही वाचा – Economics Nobel Prize : अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार क्लॉडिया गोल्डिन यांना जाहीर)

छत्तीसगड

९० सदस्यांच्या छत्तीसगड विधानसभेसाठी ७ आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान केले जाणार आहे. येथेही मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षातच आहे. परंतु, मध्यप्रदेश आणि राजस्थानसारखा अटीतटीचा सामना येथे दिसून येत नाही. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा जलवा अजून कायम आहे.

२०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसला ९० पैकी ६७ जागांवर विजय मिळाला होता. या निवडणुकीत एवढ्या जागांवर विजय मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, प्रभावशाली नेत्यांच्या अभावापोटी भाजप थोडी कमकुवत जाणवू लागली आहे. २०१८ च्या निवडणुकीत पराभव झालेल्या २१ जागांवरील उमदेवारांची घोषणा भाजपने आधीच केली आहे. काही खासदारांनाही तिकीट दिले आहे. आता घरोघरी जाऊन आपला ग्राफ उंचावण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. (BJP vs Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.