BJP मध्ये संघटनात्मक बदलाचे वारे; २२ एप्रिलपासून नव्या जिल्हाध्यक्षांची नेमणूक

97
BJP प्रदेश कार्यालयाच्या भाडे करारास मुदतवाढ

विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक बदलावर आणि मजबुतीवर भर दिला आहे. त्यानुसार येत्या २२ एप्रिलपासून संघटन पर्वातील पुढच्या टप्प्यात नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी जिल्हानिहाय निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी शुक्रवारी येथे दिली.

विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर भाजपाने संघटनात्मक बांधणीसाठी संघटन पर्व हाती घेतले आहे. या संघटन पर्वाचा आढावा भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह (Arun Singh) यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष आणि मंडल अध्यक्षांच्या निवडीबाबत माहिती दिली.

(हेही वाचा – Nirmala Sitharaman : व्यापारी युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होईल; निर्मला सीतारमण यांचा इशारा)

येत्या २० एप्रिल रोजी राज्यातील सर्व म्हणजे १ हजार १९६ मंडल अध्यक्षांची निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखीत होणार आहे. यावेळी तरूणांना अधिकाधिक संधी मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे. भाजपामध्ये पूर्णपणे लोकशाही पद्धत राबवून ही निवड प्रक्रिया होत असते, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संघटन पर्वाअंतर्गत भाजपाचे दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि १ लाख ३४ हजारांहून अधिक सक्रीय सदस्यांच्या नोंदणीचे विक्रमी उद्दीष्ट साध्य करून महाराष्ट्र भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरल्याचे अरुण सिंह (Arun Singh) यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा – बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले credit card; बँकेलाच एक कोटी २६ लाखांना फसवले)

पक्षाच्या ७०टक्के बुथ समित्यांचे गठन झाले असून २२ एप्रिलपर्यंत एक लाखापर्यंत बूथ समित्या गठन करण्याचे उद्दिष्ट आहे. पक्षाच्या रचनेनुसार एका बुथमध्ये १२ सदस्य असतात. म्हणजेच १२ लाख सक्रीय कार्यकर्त्यांची फौज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात विकसित भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कार्य करेल. ‘ संघटन सर्वोपरि’ या विचारधारेने कार्य करणाऱ्या भाजपामध्ये अंतर्गत लोकशाही असून सामूहिक निर्णय आणि परस्पर संवाद ही दोन वैशिष्ट्ये आहेत. संघटनशक्तीला बळ देण्यासाठी पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी झोकून देऊन काम करत असल्याबद्दल अरुण सिंह (Arun Singh) यांनी कौतुक केले.

…तर व्यवहाराची चौकशी होणारच

सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावई रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांनी एका कंपनीकडून सात कोटी रुपयांना जमीन खरेदी केली. वाड्रा यांनी याच जमिनीची विक्री चार महिन्यात त्याच कंपनीला ५८ कोटीला केली. अवघ्या चार महिन्यात जमिनीची किंमत एवढी वाढवणारा व्यवहार केल्यावर त्याची चौकशी होणारच, असे अरुण सिंह (Arun Singh) यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.