‘दाल मे कुछ काला हैं’ म्हणत मुंबई भाजपा ट्विटर अकाउंटवरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

120
'दाल मे कुछ काला हैं' म्हणत मुंबई भाजपा ट्विटर अकाउंटवरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
'दाल मे कुछ काला हैं' म्हणत मुंबई भाजपा ट्विटर अकाउंटवरून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची सत्ता असताना हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराची आता एसआयटी चौकशी होणार असल्यानेच उबाठा गटाकडून महापालिकेवर मोर्चा काढण्यात येत आहे अशी टीका करत ‘दाल मे कुछ काला हैं’ असा उपरोधिक टोला मुंबई भाजपाच्या ट्विटर अकाउंटवरून लगावण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेत नोव्हेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२२ या काळात झालेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव होता. अनेक कामे विनानिविदाच देण्यात आली आणि निधीचा निष्काळजीपणे वापर करण्यात आला. कामांचे नियोजन ढिसाळ होते, अशा अनियमिततांवर बोट ठेवत भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या विशेष चौकशी अहवालात ताशेरे ओढले होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर १२ हजार कोटी रुपयांच्या या कामांची चौकशी करावी, अशी विनंती कॅगला शिंदे-फडणवीस सरकारने ऑक्टोबर २०२२मध्ये केली होती. कॅगने ती मान्य केली होती. कॅगने केलेल्या विशेष चौकशीचा अहवाल उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत मांडला होता.

(हेही वाचा – Ashish Shelar : ‘उबाठा’चा मोर्चा म्हणजे ‘चोर मचाए शोर’ – आशिष शेलार)

दरम्यान मुंबई महापालिकेच्या कामकाजातील अनियमतेची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळेच पोटशूळ उठल्यानेच उबाठा गटाकडून महापालिकेवर मोर्चा काढण्यात येत असल्याची टीका मुंबई भाजपाकडून करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.