BJP District President : भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर

BJP District President :  भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षां(BJP District President)ची घोषणा करण्यात आली असून २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील मोर्चेबांधणीस भाजपाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

77

BJP District President :  भाजपाकडून राज्यातील उर्वरित जिल्हाध्यक्षां(BJP District President)ची घोषणा करण्यात आली असून २२ नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील मोर्चेबांधणीस भाजपाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

(हेही वाचा Dagdusheth Ganpati : दगडूशेठ यंदा तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती साकारणार ! )

विशेषतः मुंबईमधील तीन जिल्हाध्यक्षां(BJP District President)ची निवडही करण्यात आली असून, मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानमूर्ती शर्मा, दक्षिण मध्य मुंबईच्या अध्यक्षपदी निरंजन उभारे आणि दक्षिण मुंबईच्या अध्यक्षपदी शलाका साळवी यांची निवड करण्यात आली आहे.(BJP District President)

भाजपाकडून आज जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्याध्यक्षांच्या यादी पुढीलप्रमाणे : –

पालघरच्या जिल्हाध्यक्षपदी भरत राजपूत

वसई-विरारच्या जिल्हाध्यक्षपदी प्रज्ञा पाटील

अहिल्यानगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते

नाशिक शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील केदार

नाशिक दक्षिणच्या अध्यक्षपदी सुनील बच्छाव

नाशिक उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी यतीन कदम

पुणे दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर वडणे

कोल्हापूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव

तर गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश बारसागडे

चंद्रपूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष कासमगुट्टवार

चंद्रपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी हरिश शर्मा

वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी संजय गाते

परभणी ग्रामीणच्या शहराध्यक्षपदी सुरेश भुबंरे

छत्रपती संभाजीनगर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर शितोळे

लातूर शहरच्या जिल्हाध्यक्षपदी अजित पाटील कव्हेकर

लातुर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी बसवराज पाटील

नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी किशोर देशमुख

नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी संतुकराव हंबर्डे

बीडच्या जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.