Bihar : नितीश सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव 

Bihar : विश्वासदर्शक निकालाने राजद, काँग्रेस आणि डाव्या आघाडीला धक्का बसला. वास्तविक आनंद मोहन यांचा मुलगा आणि राजदचा आमदार चेतन आनंद, नीलम देवी आणि प्रल्हाद यादव मतदानापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या गटात गेले.

250
Bihar : नितीश सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव 
Bihar : नितीश सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव 

बिहारमध्ये पुन्हा सत्ता स्थापन केल्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. नितीश कुमार यांच्या बाजूने 129 मते पडली आहेत, तर विरोधकांनी सभात्याग केल्याने त्यांच्या बाजूने मतदान झाले नाही. सध्या काँग्रेस, राजद (RJD) आणि डाव्या पक्षांकडे मिळून 114 आमदारांचे पाठबळ आहे. (Bihar)

(हेही वाचा – Ashok Chavan : चव्हाणांच्या सोडचिठ्ठीनंतर काँग्रेसने बोलावली आमदारांची बैठक)

राजद, काँग्रेस आणि डाव्या आघाडीला धक्का

बिहार विधानसभेत 243 सदस्य आहेत. नितीश कुमार यांना बहुमतासाठी 122 आमदारांचे संख्याबळ आवश्यक होते. ‘विरोधकांनी सभात्याग करण्यापूर्वी मतदानात भाग घ्यावा’, अशी विनंती नितीश कुमार यांनी विरोधकांना केली. (Bihar Floor Test)

या वेळी नितीश कुमार म्हणाले, ”मतदान केल्यामुळे कुणाकडे किती आमदार आहेत, हे सर्वांना समजेल.” या वेळी झालेल्या विश्वासदर्शक निकालाने राजद, काँग्रेस आणि डाव्या आघाडीला धक्का बसला. वास्तविक आनंद मोहन यांचा मुलगा आणि राजदचा आमदार चेतन आनंद, नीलम देवी आणि प्रल्हाद यादव मतदानापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या गटात गेले. त्यातून नितीशकुमार सहज बहुमत मिळवतील, हे स्पष्ट झाले.

विशेष म्हणजे मतदानापूर्वी जेडीयू आणि भाजपचे (BJP) नाराज आमदारही विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. भाजपचे आमदार रश्मी वर्मा, भागीरथी देवी आणि मिश्रीलाल यादव हे कामकाजात सहभागी झाले. जेडीयूच्या आमदार विमा भारती याही विधानसभेत पोहोचल्या होत्या. या नेत्यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या समर्थनार्थ मतदान केले. (Bihar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.