Raj Thackeray : कोकण किनारपट्टीला मोठा धोका; राज ठाकरेंचा इशारा

गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. आपली महानंदा डेअरी अमूल गिळंकृत करते का असा प्रश्न उभा आहे, असे राज ठाकरे म्हणाले,

204
Raj Thackeray : डॉक्टर्स, नर्सेससह शिक्षकांची निवडणूक कामांसाठी नियुक्ती, राज ठाकरे यांनी दिला इशारा

घराच्या जमिनीचा तुकडा हे तुमचे अस्तित्व आहे. जगातील सर्व युध्द जमिनीसाठी झाली. भुगोलाशिवास इतिहास पूर्ण होत नाही. युद्ध म्हणजे जमिन ताब्यात घेणे ती लढवून घेतली जाते. पुर्वी लढाया तरी होत होत्या. आता कळत सुद्धा नाही आपल्या जमिनी गुपचुप विकत घेतलेल्या शिवडी न्हावा शिवा सागरी मार्गाच्या आजीबाजूची जमीन गेली आहे. रायगडमध्ये हीच परिस्थिती होणार आहे. बाहेरचे लोक जमिनी विकत घेणार ती माणसं आली की मराठी बोलायचे बंद होणार आहे. रायगड जिल्ह्याला मोठा धोका सतर्क राहा,  जमिनी घालवू नका. पालघर, ठाणे , रायगड हातातून जात आहे. कोकण किनारपट्टीला मोठा धोका आहे. महाराजांनी सांगितले होते, आपला शत्रू समुद्रामार्गे येईल, समुद्रावर गस्त वाढवा. आपल्याकडे शत्रू समुद्रामार्गे आले, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी इशारा दिला. राज ठाकरेंच्या हस्ते मनसे सहकार शिबिराचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.

गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा 

गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. आपली महानंदा डेअरी अमूल गिळंकृत करते का असा प्रश्न उभा आहे. सहकर चळवळ सांभाळायला अनेक ग्रेट माणसे आहेत. इतिहासाकडून शिकले पाहिजे. वर्तमान हातून निघून जाईल. मराठवाड्यात विहिरीला 800-900  फूट पाणी नाही. साखर कारखाने उभा करून ऊस लागवड होते, पाणी जास्त लागते. पाणी खेचल्यास मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार ,असे तज्ञ सांगत आहेत पण आम्हाला फरक पडत नाही. जमीन बरबाद होत आहे. वाळवंट झाल्यास ती जमीन पूर्ववत करायला 400 वर्ष लागतील, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची घोषणा मार्चमध्ये होणार)

जाती जातीत भांडणे लावली जात आहेत 

जाती जातीत भांडण लावली जात आहेत. मराठी माणूस एकत्र राहू नयेत यासाठी बाहेरचे प्रयत्न करत आहेत. आज ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे ते पाहता, महाराष्ट्राचे तुकडे पडायला वेळ लागणार नाही, नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे, इथल्या लोकांना कळत नाही महाराष्ट्रामधील सर्व चांगले बाहेर काढा नसेल निघत तर उद्ध्वस्त करा. असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray)  दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.