मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी नगरसेवक Harshad Karkar आणि युवानेत्री दिक्षा कारकर यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

45
मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी नगरसेवक Harshad Karkar आणि युवानेत्री दिक्षा कारकर यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी नगरसेवक Harshad Karkar आणि युवानेत्री दिक्षा कारकर यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई महानगरपालिकेतील (BMC) राजकीय समीकरणांना हादरा देणाऱ्या घडामोडीत, ठाकरे गटाला मोठा धक्का देत माजी नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर (Harshad Karkar) आणि युवासेना नेत्या दिक्षा हर्षद कारकर (Diksha Karkar) यांनी आज शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत या दोघांनी ‘धनुष्यबाण’ हाती घेत पक्षप्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, विभागप्रमुख स्वप्नील टेंम्बवलकर (Swapnil Tembwalkar) आणि महिला आघाडीच्या विभागप्रमुख मीना पानमंद यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – IMF Aid to Pakistan : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानला मदत करणार का? शुक्रवारी होईल फैसला)

हर्षद कारकर (Harshad Karkar) यांनी २०१७ ते २०२२ या काळात मुंबई महापालिकेच्या विधी समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांची पत्नी दिक्षा कारकर (Diksha Karkar) या युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्य असून सध्या महिला आघाडीच्या उपविभाग संघटक म्हणूनही त्या सक्रीय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आज अनेक महिला कार्यकर्त्या, शिवसैनिक, तसेच आजी-माजी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुख यांनीही शिंदे गटात प्रवेश केला.

पक्षप्रवेशानंतर बोलताना हर्षद कारकर (Harshad Karkar) यांनी सांगितले की, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाभिमुख राजकारणाला चालना मिळाली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये रस्ते, वाहतूक, जलसंपदा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात झालेले कार्य जनतेच्या हिताचे आहे.”

दिक्षा कारकर यांनीही शिंदे गटाच्या नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त करत सांगितले की, “शिवसेना (Shiv Sena) ही आता खऱ्या अर्थाने विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून, महिला आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे.”

या पक्षप्रवेशामुळे मुंबईतील शिवसेना (Shiv Sena) संघटना बळकट होणार असून आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal elections) शिंदे गटाच्या ताकदीत लक्षणीय वाढ होणार, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.