Bhagwant Mann : मुख्यमंत्री भगवंत मान यांची पुन्हा एकदा फुटीरतावादी भाषा; पंजाब आणि भारत यांच्यात सीमारेषा आखू नका

Bhagwant Mann : पंजाबमधील (Punjab) शेतकरी आंदोलनकर्त्यांनी दिल्लीची कोंडी करू नये, यासाठी हरियाणा सरकारने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजेच पंजाब आणि भारत यांच्यातली सीमारेषा आहे, असा आरोप भगवंत मान करत आहेत.

189
Bhagwant Mann : मुख्यमंत्री भगवंत मान यांची पुन्हा एकदा फुटीरतावादी भाषा; पंजाब आणि भारत यांच्यात सीमारेषा आखू नका
Bhagwant Mann : मुख्यमंत्री भगवंत मान यांची पुन्हा एकदा फुटीरतावादी भाषा; पंजाब आणि भारत यांच्यात सीमारेषा आखू नका

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा एकदा फुटीरतावादी भाषा केली आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पंजाब आणि भारत यांच्यात सीमारेषा आखू नका. शेतकऱ्यांविषयी बोला, असे भगवंत मान (Bhagwant Mann) म्हणाले आहेत.

दिल्लीच्या (Delhi) सीमांवर शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करण्यासाठी जमत असतांना भगवंत मान यांनी ही वक्तव्ये केली आहेत. हरियाणा सरकार शेतकऱ्यांना रोखण्यासाठी ठिकठिकाणी कुंपण घालत असल्याचा आरोप भगवंत मान यांनी केला.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : अयोध्येपाठोपाठ लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदिर निर्माण होईल – देवेंद्र फडणवीस)

भगवंत मान यांचे हरियाणा सरकारवर आरोप

पंजाबमधील (Punjab) शेतकरी आंदोलनकर्त्यांनी दिल्लीची कोंडी करू नये, यासाठी हरियाणा सरकारने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजेच पंजाब आणि भारत यांच्यातली सीमारेषा आहे, असा आरोप भगवंत मान करत आहेत.

दिल्लीची पुन्हा एकदा कोंडी होणार ?

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या (Agricultural Laws) विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र ते आंदोलन वेगवेगळ्या फुटीरतावादी शक्तींनी हायजॅक केले होते. केंद्रातील मोदी सरकारने अखेरीस फुटीरतावादी शक्तींना संधी मिळू नये; म्हणून कृषी कायदे मागे घेतले. त्यानंतर आता 16 फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी बंद पुकारला आहे. दिल्लीची पुन्हा एकदा कोंडी करण्याचा त्यांचा मानस आहे.

शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. पंतप्रधानांचे आणि गृहमंत्र्यांचे निवासस्थान घेण्याचा त्यांचा इरादा असल्याचे गुप्तचर खात्याच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Bhagwant Mann)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.