Barsu Refinery: बारसू रिफायनरीसंदर्भात शासनाच्यावतीने शरद पवारांना दिला ‘हा’ शब्द

134
बारसू रिफायनरी
Barsu Refinery: बारसू रिफायनरीसंBarsu Refinery: बारसू रिफायनरीसंदर्भात शासनाच्यावतीने शरद पवारांना दिला 'हा' शब्ददर्भात उदय सामंतांनी शरद पवारांना दिला 'हा' शब्द

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीसंदर्भात पुन्हा एकदा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोमवारी दुपारी भेट घेतली. या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीदरम्यान झालेल्या चर्चेविषयी स्पष्ट केले. या भेटीत शासनाच्यावतीने बारसू रिफायनरीसंदर्भात शरद पवारांना एक शब्द दिला असल्याची माहिती उदय सामंतांनी दिली.

सामंत नक्की काय म्हणाले? आणि बारसू रिफायनरीसंदर्भात पवारांना काय दिला शब्द?

उदय सामंत म्हणाले की, ‘आपल्या सगळ्यांना माहितेय, रविवारी जे आंदोलनकर्ते आहेत, त्यांच्या काही प्रमुख मंडळींनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आणि मी रविवारीच सांगितले होते की, शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेसोबत माझी चर्चा झाली. सोमवारी ३.३० वाजता शरद पवारांची भेट घ्यायला मला सांगितले होते. बारसू रिफायनरी प्रकल्प होणाऱ्या ठिकाणची वस्तुस्थिती नक्की काय आहे, हे शरद पवारांना सांगितले. या बैठकीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड होते. महत्त्वाचे म्हणजे आंदोलनकर्त्यांची जी काही शंका असेल, जो काही गैरसमज असेल, तो कुठच्याही परिस्थिती दूर झाल्याशिवाय हा प्रकल्प रेटणार नाही. हा संदेश मुख्यमंत्र्यांनी मला दिला होता. तिच चर्चा सोमवारी, शरद पवार यांच्यासोबत झालेली आहे. रिफायनरीसंदर्भात शेतकऱ्यांच्या शंका, गैरसमज कशाप्रकारे दूर करता येतील, यासंदर्भात देखील सविस्तर चर्चा झाली. पण शासनाच्या वतीने शरद पवारांना शब्द दिलाय की, कुठच्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय करून शेतकऱ्यांशी चर्चा न करता हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही.

(हेही वाचा – ‘उद्धव ठाकरेंचे धर्मांतर झालेय, राजकीय लव्ह जिहाद झालाय’; The Kerala Files संदर्भात बोलताना नितेश राणेंची ठाकरेंवर गंभीर टीका)

पुढे सामंतांनी सांगितले की, ज्या शंका आंदोलनकर्त्यांनी रविवारी शरद पवारांसमोर मांडल्या होत्या, त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली. म्हणूनच सांगितले की, कुठच्याही परिस्थितीमध्ये, कुठच्याही स्तरावर शासन आंदोलनकर्त्यांचे जे प्रमुख आहेत, त्यांच्याशी बोलायला तयार आहेत. स्थानिकांसोबत बोलायला तयार आहे. कुठचीही जोर जबरदस्ती केली जाणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा भाग जो गेले कित्येक दिवस मी सांगतोय, हे फक्त माती परीक्षण आहे. आणि माती परीक्षण झाल्यानंतर कंपनी ठरवणार आहे की, तिथे प्रकल्प करायचा आहे की नाही. ही देखील वस्तुस्थिती शरद पवारांच्या कानावर घातली आहे. आणि पुन्हा एकदा मी त्यांना शब्द दिला आहे की ज्यापद्धतीने सर्वजण शरद पवारांना रविवारी भेटले. त्यांच्या काही शंका आहेत, नोटीस मागे घेणे वगैरे हे चर्चा सुरू झाल्याशिवाय होणार नाही. म्हणून शासन चर्चा करायला तयार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.