‘बॅनर वॉर’ : उद्धव सेनेचा बॅनर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फाडला

113
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि उद्धव सेनेतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. ताडदेव परिसरात भाजपाच्या बॅनरवर शिवसेनेने आपला बॅनर चिकटवल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित बॅनर फाडून टाकला आहे.

भाजपाने प्रचंड नाराजी

ताडदेवमधील बस स्टॉपवर भाजपाने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारा बॅनर लावला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची छायाचित्रे होती. मात्र उद्धव सेनेने या बॅनरवर आपला बॅनर चिकटवला. त्यामुळे भाजपाने प्रचंड नाराजी व्यक्त केली. मंगळवारी रात्री ‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांनी ताडदेव बस थांब्यावर जात शिवसेनेचा बॅनर फाडून टाकला. उद्धव ठाकरेंच्या नकली सेनेने असे बॅनर लावले, तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.