Bangladesh Yunus Government : स्थानिक पक्ष, लष्कराचा विरोध अशातच भारताविरोधात ओकली गरळ; मोहम्मद युनूस यांची खुर्ची धोक्यात?

Bangladesh Yunus Government :   बांगलादेश सद्यस्थितीस राजकीय स्थित्यंतरातून जात असून अंतिम सरकार(Bangladesh Yunus Government)चे प्रमुख युनूस खान यांच्या खुर्चीला धक्का बसण्याची शक्यता आहे. युनूस सरकार आणि लष्करातील यांच्यातील तणाव उफाळून आला असून सत्ता गमावण्याच्या भीतीने मोहम्मद युनूस यांनी भारतविरोधी घोषणाबाजी केली आहे.

84

Bangladesh Yunus Government :   बांगलादेश सद्यस्थितीस राजकीय स्थित्यंतरातून जात असून अंतिम सरकार(Bangladesh Yunus Government)चे प्रमुख युनूस खान यांच्या खुर्चीला धक्का बसण्याची शक्यता आहे. युनूस सरकार आणि लष्करातील यांच्यातील तणाव उफाळून आला असून सत्ता गमावण्याच्या भीतीने मोहम्मद युनूस यांनी भारतविरोधी घोषणाबाजी केली आहे. ज्या फुटीरतावाद्यांनी माजी पंतप्रधान हसीना शेख यांची सत्ता उलथवून टाकली तेच आता मोहम्मद युनूस यांना पदच्युत करण्याकरिता धजावले आहेत.

दरम्यान, बांगलादेशच्या अंतरिम सरकार(Bangladesh Yunus Government)चे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी सध्याच्या राजकीय संकटाला ‘भारताचे षडयंत्र’ म्हटले आहे. एका बैठकीत ते म्हणाले, जुलै २०२४ नंतर बांगलादेशात झालेले बदल भारत स्वीकारत नाही. बांगलादेश एका मोठ्या संकटात असून आपल्या बदलेल्या परिस्थितीला भारत स्वीकारू इच्छित नाही. शक्य झाल्यास ते एका दिवसात संपवू इच्छित आहे, असे मोहम्मद युनूस म्हणाले होते.

(हेही वाचा  “…तर परिस्थिती आणखी वाईट होईल”; Shashi Tharoor यांचा पाकिस्तानला कडक इशारा )

या बैठकीला उपस्थित नागरिक एक्य परिषदेचे प्रमुख महमूदुर रहमान मन्ना म्हणाले, त्यांनी(युनूस) चर्चेची सुरुवात असे सांगून केली की, आपण एका मोठ्या संकटात आहोत. ते संकट म्हणजे भारताचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे असा होता. भारत आपल्यात आलेला बदल अजिबात स्वीकारू इच्छित नाही. शक्य असल्यास, भारत आपल्याला एका दिवसात संपवू इच्छित आहे, त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. असे त्यांनी सांगितले.

भारत ‘विनाश’ करण्याचा कट रचत आहे – मोहम्मद युनूस

बांगलादेशातील सध्याच्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर, मोहम्मद युनूस यांनी रविवार, २५ मे २०२५ रोजी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत बांगलादेशातील राजकीय पक्ष आणि इतर संघटनांसोबत होती. तसेच, स्थानिक राजकीय पक्षांनी लवकरच सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणीदेखील केली आहे. तथापि, मोहम्मद युनूस यांनी निवडणुकांबाबत कोणताही रोडमॅप दिला नाही उलट त्यांनी भारताविरुद्ध गरळ ओकल्याचे दिसून आले आहे. जुलै २०२४ नंतर बांगलादेशात झालेले बदल भारत स्वीकारत नाही, अशी गरळ मोहम्मद युनूस यांनी ओकली.

बांगलादेशी लष्करासोबत वाद

बांगलादेशचे सैन्य आणि अवामी लीगवरील बंदीनंतरचा मुख्य पक्ष बीएनपी युनूस सरकारच्या विरोधात गेला आहे. मोहम्मद युनूस यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये सत्ता काबीज केली होती. त्यावेळी लोकांना अपेक्षा होती की काही महिन्यांत निवडणुका होतील. तथापि, अंतिम सरकार प्रमुक मोहम्मद युनूस स्वतः सत्तास्थानी राहू इच्छितात. जवळजवळ १० महिने उलटून गेल्यानंतरही त्यांनी निवडणुकांबाबत कोणताही आराखडा दिलेला नाही, असे बोलले जात आहे.(Bangladesh Yunus Government)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.