Bangladesh Violence : शेख हसीना असो किंवा आता लष्कर विरोधात आंदोलन, बांगलादेशात हिंदूंचाच बळी !

Bangladesh Violence : शेख हसीना असो किंवा आता लष्कर विरोधात आंदोलन, बांगलादेशात हिंदूंचाच बळी !

55
Bangladesh Violence : शेख हसीना असो किंवा आता लष्कर विरोधात आंदोलन, बांगलादेशात हिंदूंचाच बळी !
Bangladesh Violence : शेख हसीना असो किंवा आता लष्कर विरोधात आंदोलन, बांगलादेशात हिंदूंचाच बळी !

 

बांगलादेशात (Bangladesh Violence ) शेख हसीना यांचा सत्तापालट घडवून आणताना तिथे जे अराजक माजले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचा संहार झाला. आता अंतरिम सरकारचे प्रमुख युनूस यांच्याविषयी नाराजी आहे. तसेच लष्कराच्या विरोधातही संताप आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बांगलादेशात विद्यार्थी संघटना आणि धर्मांध मुसलमान रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांच्याकडून याही वेळेला हिंदूंनाच लक्ष्य केलं जात आहे. बांगलादेशात कोणतीही घटना घडली तरी हिंदूच टार्गेट होतात, हा तिथला इतिहास आहे. (Bangladesh Violence )

हेही वाचा-Gujarat : एलओसीवर पाकिस्तानी घुसखोर ठार ; सीमेवर बीएसएफ जवानांनी घातले कंठस्नान

बांगलादेशमध्ये गेल्या काही काळापासून राजकीय अस्थिरता वाढत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या सत्तापालटामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांचे पद आणि देश सोडावा लागला. शेख हसीना यांच्यानंतर बांगलादेशात मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले, परंतु आता त्यांच्याही अडचणी वाढत आहेत. बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा सत्तापालटाची अटकळ तीव्र झाली आहे. (Bangladesh Violence )

बांगलादेशमध्ये आज (24 मे) इस्लमामिक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमुळे पुन्हा एकदा बांगलादेशामध्ये हिंसाचार उफाळला आहे. शेख हसीनांच्या विरोधातील बंडात हिंदूंनाच टार्गेट करण्यात आले होते. आताही लष्कर विरोधात आंदोलन सुरू असताना हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. (Bangladesh Violence )

दोन दिवसांपूर्वी बांगलादेशातील जेसोर जिल्ह्यातील अभयनगर उपजिल्हामधील दाहर मशिहाटी गावात गुरुवारी (२२ मे) मुस्लिम जमावाने हिंदूंच्या घरांवर जाळपोळ केली. माशांच्या कुंपणाच्या मालकीच्या वादातून ५० वर्षीय कृषक दलाचे नेते तारिकुल इस्लाम यांची हत्या झाल्यानंतर लगेचच ही घटना घडली. इस्लाम यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर, मुस्लिम अतिरेक्यांच्या जमावाने दहर मशिहाटी गावात २० हून अधिक हिंदू घरांना आग लावली. त्यांनी ४ दुकानांची तोडफोड केली आणि २ इतरांना आग लावली. लक्ष्यित हल्ल्यांमध्ये १० हून अधिक लोक जखमी झाले. (Bangladesh Violence )

तारिकुल इस्लामच्या हत्येनंतर, मुस्लिम जमावाने गावातील हिंदूंच्या घरांवर हल्ला केला आणि त्यांची घरे आणि दुकाने जाळून टाकली. छळ झालेल्या अल्पसंख्याक समुदायाच्या घरांचे उद्ध्वस्त झालेले दृश्य आता सोशल मीडियावर समोर आले आहेत. (Bangladesh Violence )

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.