Balochistan liberation Army ने पाकिस्तानचे २३ जवान केले ठार

६ जूनच्या रात्री पाकिस्तानी सैन्य मस्तंग परिसरात पुढे सरकत होते तेव्हा बलूच लिबरेशन आर्मीसोबत त्यांचा संघर्ष सुरू झाला.

76
पाकिस्तानात Balochistan liberation Army कडून पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच आहे. एका बाजूला बलूच प्रांत पाकिस्तानापासून स्वतंत्र झाल्याची घोषणा बलूच नेत्यांनी केली आहे. तर दुसरीकडे Balochistan liberation Army पाकिस्तानी सैन्याला संधी मिळेल तिथे ठार करत आहे. असाच एक संघर्ष पुन्हा झाला आणि त्यात Balochistan liberation Army ने २३ पाकिस्तानी सैन्याला ठार केले. यात बलूच लिबरेशन आर्मीचे ९ जवानही ठार झाल्याचे पुढे आले आहे.
६ जूनच्या रात्री पाकिस्तानी सैन्य मस्तंग परिसरात पुढे सरकत होते तेव्हा बलूच लिबरेशन आर्मीसोबत त्यांची झटापट झाली. सकाळपर्यंत सुरू असलेल्या या संघर्षात पाकिस्तानी सैन्याचे ८ जवान मारले गेले तर अनेकजण जखमी झाले. त्याशिवाय ८ जूनला आणखी एक चकमक झाली त्यातही पाकिस्तानी सैन्याचे जवान मारले गेले. बलूचिस्तानात अनेक भागात हा संघर्ष सुरू असल्याचे बलूच लिबरेशन आर्मीचे (Balochistan liberation Army) प्रवक्ते म्हणाले. बलूचिस्तानात बंडखोर सशस्त्र समुहाविरोधात पाकिस्तानी सैन्याचे अभियान सुरू आहे. पाकिस्तानी सैन्याने मोठ्या संख्येने जवानांना बलूचिस्तानात उतरवले आहे तरीही बलूचिस्तानातील बंडखोर भारी पडत आहेत.
मागील काही दिवसांपासून बलूचिस्तानच्या अनेक शहरांवर कब्जा करण्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. बलूच बंडखोरांना मिळणाऱ्या यशाने पाकिस्तानी सैन्य खवळले आहे. त्यातूनच तिथल्या नागरिकांविरोधात सैन्याने क्रूर अभियान सुरू केले. बलूचिस्तानात पुन्हा एकदा लोक अचानक गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. बलूच नागरिक गटाने सांगितले की, बलूचिस्तानात २ वेगवेगळ्या ठिकाणांहून ९ लोकांना बळजबरीने गायब करण्यात आले आहे. पासनीजवळ सुरक्षा जवानांनी २ जणांना ताब्यात घेतले आणि अज्ञात स्थळी नेले असे बलूचिस्तान पोस्टमध्ये रिपोर्ट आला आहे. (Balochistan liberation Army)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.