आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी प्रक्षेपित होणारे अॅक्सिओम-४ मिशन (Axiom 4 Launch Delay) चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. ते आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.३० वाजता प्रक्षेपित होणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) सांगितले की, फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. (Axiom 4 Launch Delay)
Standing down from tomorrow’s Falcon 9 launch of Ax-4 to the @Space_Station to allow additional time for SpaceX teams to repair the LOx leak identified during post static fire booster inspections. Once complete – and pending Range availability – we will share a new launch date pic.twitter.com/FwRc8k2Bc0
— SpaceX (@SpaceX) June 11, 2025
या मोहिमेचे प्रक्षेपण पुढे ढकलण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी हे अभियान २९ मे रोजी प्रक्षेपित होणार होते. नंतर ते ८ जून रोजी होणार होते. त्यानंतर ते १० जून आणि नंतर ११ जून रोजी होणार होते. (Axiom 4 Launch Delay)
Falcon 9 and Dragon at sunrise ahead of tomorrow’s launch of @Axiom_Space’s Ax-4 mission. Weather is 85% favorable for liftoff, with teams continuing to monitor high-winds in the ascent corridor → https://t.co/LU1wyD7X9s pic.twitter.com/eCgQdX7pXo
— SpaceX (@SpaceX) June 10, 2025
प्रक्षेपणापूर्वी, बुधवारी सकाळी प्रक्षेपण वाहनाच्या बूस्टर स्टेजची कामगिरी तपासण्यात आली. या दरम्यान, प्रक्षेपण पॅडवर ७ सेकंदांची हॉट टेस्ट घेण्यात आली. त्यानंतर प्रोपल्शन बेमध्ये LOX गळती (ऑक्सिजन गळती) आढळून आली, त्यानंतर मोहीम पुढे ढकलण्यात आली. (Axiom 4 Launch Delay)
हेही वाचा-Bhandara News : भंडाऱ्यात वादळीवाऱ्याचं थैमान ! 45 फूट उंच भगवान बुद्धांची मूर्ती कोसळली
लवकरच अॅक्सिओम-४ मिशनची नवीन तारीख जाहीर केली जाईल. अॅक्स-४ मोहिमेचा (Axiom 4 Launch Delay) मुख्य उद्देश अवकाशात संशोधन करणे आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे आहे. हे अभियान खाजगी अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी देखील आहे आणि ते अॅक्सियम स्पेस प्लॅनिंगचा एक भाग आहे, जे भविष्यात एक व्यावसायिक अंतराळ स्थानक (अॅक्सियम स्टेशन) बांधण्याची योजना आखत आहे. (Axiom 4 Launch Delay)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community