दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला

110

काॅंग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी कळमनुरी येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. सुदैवाने मोठा जमाव असल्याने हल्लेखोरांना तत्काळ अटक करण्यात आली. मात्र, या हल्ल्यानंतर सातव यांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी प्रतिक्रिया देताना एक भीती व्यक्त केली आहे. मी महिला लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मला घाबरवून घरी बसवण्याचा प्रयत्न होता. पण मी अजिबात घाबरणार नाही, असे सांगताना माझ्या जीवाला धोका आहे, असे प्रज्ञा सातव यांनी सांगितले.

( हेही वाचा: ‘एकच वादा…अजितदादा’; सत्यजित तांबे आमदारकीची शपथ घेताना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी )

..तरीही माझे काम करत राहणार

आमदार प्रज्ञा सातव या बुधवारी हिंगोली दौ-यावर होत्या. त्यावेळी कसबे धवंडा या गावात त्या एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सातव यांनी फेसबुक पोस्टदेखील टाकली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, माझ्या जीवाला धोका असला तरी मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र, त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरु ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता, असे प्रज्ञा सातव म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.