Assembly Election Exit Poll 2023 : राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का?

73
Assembly Election Exit Poll 2023 : राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का?

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक संपताच एक्झिट पोलचे (Assembly Election Exit Poll 2023) आकडे समोर आले आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोराम या पाचही राज्यांतील एक्झिट पोलची आकडेवारी भाजप, कॉंग्रेस आणि स्थानिक पक्षांमध्ये अटीतटीची लढत झाली असल्याचे दाखविणारी आहे. कोणत्या राज्यांत कोणत्या पक्षाला सत्ता मिळणार हे तर 3 डिसेंबर रोजीच स्पष्ट होईल; परंतु एक्झिट पोलने काहीसं चित्र स्पष्ट झालं आहे.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 7 नोव्हेंबर रोजी मिझोराम (Assembly Election Exit Poll 2023) विधानसभा निवडणुकीसोबत आणि दुसरा टप्पा 17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसोबत पार पडला. तर राजस्थान विधानसभेच्या निवडणुका 25 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात झाल्या होत्या.

(हेही वाचा – World AIDS Day 2023 : जाणून घ्या काय आहे यावर्षीची थीम)

या निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने प्रामुख्याने (Assembly Election Exit Poll 2023) अशोक गेहलोत सरकारची कामे आणि कामगिरी यावर लक्ष केंद्रित केले आणि आश्वासनावर भर दिला. तर दुसरीकडे, महिलांवरील गुन्हे, तुष्टीकरण, भ्रष्टाचार आणि पेपर लीक यासारख्या मुद्द्यांवर भाजपने काँग्रेसवर पलटवार केला.

राजस्थान एक्झिट पोल

सध्या सगळ्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये (Assembly Election Exit Poll 2023) चुरशीची लढत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला फायदा होईल असे भाकीत केले गेले असून राज्यात फिरता दरवाजाचा कल कायम राहील असे सूचित केले आहे. (Assembly Election Exit Poll 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.