जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २८ जणांना दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून हिंदू असल्याचे समजताच ठार (Pahalgam Attack) केले. या हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लोक रस्त्यावर उतरून पाकिस्तानचा निषेध करू लागले आहेत, असे असताना आसाममध्ये मात्र काही जण आनंद व्यक्त करत होते. आसाम पोलिसांनी अशा १६ जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये राज्य विरोधी पक्ष एआययूडीएफचे आमदार अमिनुल इस्लाम यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ट्विटरवर लिहिले की, “या लोकांवर कडक कारवाई केली जात आहे. गरज पडल्यास त्यांच्यावर एनएसए अंतर्गत कारवाई केली जाईल.” (Pahalgam Attack)
(हेही वाचा Pakistan : देशभरातून पाकिस्तानी मायदेशी परतत असताना केरळ मात्र ‘त्या’ तीन पाकड्यांना ठेवून घेणार)
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतेही साम्य नाही. दोन्ही शत्रू देश आहेत आणि आपण असेच जगले पाहिजे. त्यांनी असेही म्हटले की, आसाम सरकार कोणत्याही किंमतीत देशविरोधी कारवाया सहन करणार नाही. या घटनेनंतर, देशाच्या अनेक भागात राहणारे देशद्रोही घटक पहलगाम हिंसाचारावर (Pahalgam Attack)आनंद व्यक्त करत आहेत. अशा लोकांवर सतत कारवाई केली जात आहे.
Join Our WhatsApp Community