Ashok Chavan : अशोक चव्हाण नॉट रिचेबल; भाजपमध्ये प्रवेश करणार?

नियमानुसार अशोक चव्हाण यांना आधी कॉँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आणि मगच ते आमदारकीचा राजीनामा देवू शकणार आहे, त्यानुसार चव्हाण यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

326
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पुन्हा एकदा भाजपमध्ये पक्षप्रवेशास सुरुवात झाली आहे. असेच पक्षप्रवेश २०१९मध्ये मोठ्या प्रमाणात झाले होते. २०२४च्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पक्षप्रवेशाला वेग आला आहे. विशेष म्हणजे नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी जोरदार चर्चा सोमवारी, १२ फेब्रुवारी सुरु झाली, त्यांच्यासोबत काँग्रेसचे ७ ते ८ आमदारही प्रवेश करणार आहेत. सध्या अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे नॉट रिचेबल असल्यामुळे त्यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता बळावली आहे.

विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा दिला?

सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांनी आमदारकीचा राजीनामा त्यांना दिला आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार? 

या सगळ्याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण आले आहे. राहुल नार्वेकर यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून (Ashok Chavan) सांगण्यात आले. मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असा जाणकारांचा अंदाज आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अशी चर्चा अनेक दिवसांपासून होती, कारण ते काँग्रेसमध्ये नाराज आहे, अशी चर्चा सुरु आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.