पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत ‘ऑपरेशन सिंदूर’ केलं. दहशतवाद्यांविरोधातील भारतीय लष्कराचं ‘ऑपरेशन सिंदूर’ हे यशस्वी झालं. या ऑपरेशनची माहिती देशभरात पोहोचवण्यासाठी भाजपाकडून तिरंगा यात्रा काढली जात आहे. याच दरम्यान अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीलं आहे. “युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, या काळात संयम बाळगावा” असं म्हटलं आहे. यावर अमित ठाकरेंच्या या भूमिकेशी भाजपा सहमत नाही. (Ashish Shelar )
तिरंगा यात्रा आम्ही काढणारच…
अमित ठाकरेंच्या या भूमिकेशी भाजपा सहमत नाही. या पत्रावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar )यांनी स्पष्ट केलं आहे की, “सध्या सारं जग भारताचं कौतुक करत आहे. डिल्पोमेसीमध्येही आपण आघाडीवर आहोत. त्यामुळं कोण काय बोलतंय? त्यावर आम्ही लक्ष देत नाही. तिरंगा यात्रा आम्ही काढणारच.” असं प्रत्त्युत्तर शेलारांनी अमित ठाकरेंना दिलं आहे. (Ashish Shelar )
अमित ठाकरेंनी लिहीलेल्या पत्रात काय ?
राष्ट्रीय सुरक्षेचे निर्णय घेतले त्याबद्दल अमित ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. मात्र ऑरेशन सिंदूरनंतर राज्यात जो जल्लोष साजरा केला जातोय त्याबाबत अमित ठाकरेंनी खंत व्यक्त केली आहे. ‘सध्याची स्थिती विजयाची नसून युद्धविरामाची आहे, त्यातच जवानांचे प्राण देखील गेलेत. अशा स्थितीत विजय साजरा करणे अनेकांच्या मनाला वेदना देणारं आहे.’ असं अमित ठकारेंनी लिहीलं आहे. (Ashish Shelar )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community