संसदेतही Asaduddin Owaisi यांची देशविरोधी भूमिका; शपथ घेतल्यानंतर म्हटले ‘जय फिलिस्तीन’

Asaduddin Owaisi यांनी उर्दुमध्ये शपथ घेतल्यानंतर 'जय भीम, जय मीम' घोषणा दिल्यानंतर 'जय फिलीस्तिन, अल्ला हूं अकबर' ही घोषणा दिली. असदुद्दीन औवेसी यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली आहे.

178
संसदेतही Asaduddin Owaisi यांची देशविरोधी भूमिका; शपथ घेतल्यानंतर म्हटले 'जय फिलिस्तीन'
संसदेतही Asaduddin Owaisi यांची देशविरोधी भूमिका; शपथ घेतल्यानंतर म्हटले 'जय फिलिस्तीन'

१८ व्या लोकसभेत खासदारांचा शपथविधी अनेक कारणांनी चर्चेत येत आहे. २४ आणि २५ जून रोजी खासदारांनी संसदेत शपथ घेतली. या वेळी अनेक खासदारांनी शपथ घेऊन झाल्यानंतर आपल्या आस्थेप्रमाणे ‘वंदे मारतम’, ‘राम कृष्ण हरि’ यांसारख्या घोषणा दिल्या. भाग्यनगरचे (Hyderabad) एमआयएमचे (MIM) खासदार असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi) यांनी मात्र शपथ घेतांना देशाप्रती आस्था न दाखवता पुन्हा एकदा धार्मिक द्वेष प्रकट केला आहे. त्यांनी उर्दुमध्ये शपथ घेतल्यानंतर ‘जय भीम, जय मीम’ घोषणा दिल्यानंतर ‘जय फिलीस्तिन, अल्ला हूं अकबर’ ही घोषणा दिली.

असदुद्दीन औवेसी यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली आहे. बिस्मिल्लाचे पठण करून ओवैसी यांनी खासदार म्हणून अल्लाहची शपथ घेतली. त्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत याला विरोध केला. भाजपा नेते जी. किशन रेड्डी यांनी औवेसी यांच्या घोषणा रेकॉर्डमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा – अडीच वर्षांत ड्रग्ज प्रकरण थांबवण्यासाठी तुम्ही काय केलं? उडता मातोश्री चित्रपट काढायचा का? Nitesh Rane यांचा सवाल)

ही राज्यघटनेच्या विरोधात घोषणाबाजी – भाजपचा पलटवार

भाजप नेते जी. किशन रेड्डी (Kishan Reddy) म्हणाले की, “शपथ घेतांना या देशाच्या संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’चा (Jay Palestine) नारा पूर्णपणे चुकीचा आहे. ते एकीकडे राज्यघटनेविषयी बोलतात, तर दुसरीकडे राज्यघटनेच्या विरोधात घोषणाबाजी करतात. भारतात राहत असतांना पॅलेस्टाईनचे गोडवे गाणे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा घटना या लोकांचा खरा चेहरा समोर आणतात. असे प्रकार ते रोज करतात. लोकसभेत अशा घोषणा देणाऱ्या लोकांना लक्षात ठेवण्याची विनंती पटवण्याची मी लोकांना करेन.”

पॅलेस्टाईन आहे इस्लामी आतंकवादाचा पोशिंदा

इस्रायलवर हमास (Israel–Hamas war) या आतंकवादी संघटनेने हल्ला केल्यानंतर इस्रायलने इस्लामी आतंकवादाचा पोशिंदा असलेल्या पॅलेस्टाईनवरही कारवाई करण्यास सुरुवात केली. या वेळी गेली अनेक वर्षे पॅलेस्टाईनमधून हमासचे आतंकवादी इस्रायलवर कुरघोडी करत आहेत. या युद्धाच्या वेळी भारताची आतंकवादी हल्ल्याला बळी पडलेल्या इस्रायलला सहानुभूती होती. असे असूनही देशभरात अनेक मुसलमानांनी उघडपणे पॅलेस्टाईनला म्हणजेच आतंकवादाला पाठिंबा दिला होता. त्याच्या समर्थनार्थ मोर्चाही अनेक शहरांत काढण्यात आला.

ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर दिलेली ‘जय फिलिस्तीन’ ही घोषणा औवेसींना देशाच्या भूमिकेपेक्षा पॅलेस्टाईनच्या आतंकवाद्यांचा जास्त कैवार आहे, हेच दाखवते, अशी चर्चा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.