Devendra Fadanvis : केजरीवाल उद्धव ठाकरेंच्या भेटीला; फडणवीसांची खोचक टीका; म्हणाले…

भाजपला पराभूत करण्याकरिता केजरीवाल कोणाशी ही हात मिळवणी करण्यासाठी तयार आहेत आणि उद्धव ठाकरे कोणासोबत देखील बसायला तयार आहेत. यातूनच भारतीय जनता पक्षाची ताकत दिसते, अशी टीका फडणवीसांनी केली.

124

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीवरुन उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केले. मला अतिशय आनंद होतोय. केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांना एकमेकांची गरज लागते. म्हणजेच, भाजपला पराभूत करण्याकरिता केजरीवाल कोणाशी ही हात मिळवणी करण्यासाठी तयार आहेत आणि उद्धव ठाकरे कोणासोबत देखील बसायला तयार आहेत. यातूनच भारतीय जनता पक्षाची ताकत दिसते, अशी टीका फडणवीसांनी केली. यावेळी फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर बोलतांना फडणवीसांनी थेट बँकवाल्यांना तंबी दिली. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे. शेतकऱ्यांना बँक कर्ज देत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देणार असून हे आता खपवून घेतले जाणार नाही, असे ते म्हणाले. याशिवाय, शेतकऱ्यांना शिवसेना-भाजपचे सरकार हे सगळ्या प्रकारची मदत करण्यास तत्पर आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जलयुक्त शिवारवर बोलताना फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झाली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेचा आढावा घेण्यात आला. जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली यावी हे, ध्येय आहे. आज झालेल्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला देखील गती देण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.

(हेही वाचा Gyanvapi Case : ‘औरंगजेब क्रूरही नव्हता ना त्याने विश्वेश्वराचे मंदिर तोडले…’, मशीद समितीचा न्यायालयात दावा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.