Arvind Kejriwal: जेलमध्ये बसुन केजरीवाल खाताहेत गोड धोड, काय आहे केजरीवालांचा नवा डाव?

128
जेलमध्ये बसुन केजरीवाल खातायत गोड धोड, काय आहे केजरीवालांचा नवा डाव?
जेलमध्ये बसुन केजरीवाल खातायत गोड धोड, काय आहे केजरीवालांचा नवा डाव?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपांमुळे तिहार जेलमध्ये आहेत. यातच दिल्लीच्या राऊज अवेन्यू कोर्टात केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सुनावणीच्या वेळी ईडीने (ED) दावा केला की ते प्रकृतीच्या कारणावरुन जामीन मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक गोड खात आहेत. कोर्टासमोर ईडीने म्हटलं की, केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना टाईप २ चा मधुमेहाचा आजार आहे. ते जेलमध्ये बटाटा-पुरी, आंबे आणि गोड खात आहेत. असं ते जाणीवपूर्वक करत आहेत. हा एक प्रकारे मेडिकलच्या आधारावर जामीन घेण्याचा प्रकार आहे. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा –Sakshi Malik : कुस्तीपटू साक्षी मलिकचा टाईम मॅगझिनच्या १०० प्रभावशाली व्यक्तिमत्त्वात समावेश)

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या प्रकृतीवरुन ईडीने म्हटलं की, कोर्टाने केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना घरचं जेवण खाण्याची मुभा दिली आहे. जेल डीजींनी आम्हाला केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आहाराविषयी माहिती दिली आहे. त्यांना बीपीचा आजार आहे. तरीही ते बटाटा-पुरी, केळी, आंबे आणि गरजेपेक्षा गोड पदार्थ खात आहेत. ईडीने म्हटलं की, टाईप-२ प्रकारची शुगर असणारा व्यक्ती असे पदार्थ खात असल्याचं आम्ही कधीच ऐकलं नाही. परंतु हे पदार्थ ते रोज खात आहेत. हा सगळा उपद्व्याप जामिनासाठी सुरु असल्याचं ईडीने म्हटलंय. यावर कोर्टाने केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या वकिलांना सांगितलं की, तुम्ही मुख्यमंत्र्यांचा डाएट प्लान आम्हाला द्यावा. आम्हीही जेलमधून त्यासंदर्भातला रिपोर्ट मागवून घेऊ. या प्रकरणावर आता शुक्रवार, दि. १९ रोजी सुनावणी होणार आहे. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा –CM Eknath Shinde: बारामतीमध्ये भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे शुगरचे पेशंट आहेत. त्यामुळे त्यांच्या वकिलांनी सुरुवातीलाच राऊज अवेन्यू कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने नियमित डॉक्टरांकडून कन्सल्टिंग घेण्याची मागणी केली होती. परंतु आता त्यांच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतला आहे. याच अर्जाच्या विरोधात ईडीने कोर्टात त्यांच्या आहाराबद्दल माहिती दिली. (Arvind Kejriwal)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.