दमानिया लोकशाही संस्थांवरच संशय घेतात, Chhagan Bhujbal यांच्यावरील टीका निरर्थक; आनंद परांजपे यांचा पलटवार!

37
दमानिया लोकशाही संस्थांवरच संशय घेतात, Chhagan Bhujbal यांच्यावरील टीका निरर्थक; आनंद परांजपे यांचा पलटवार!
  • प्रतिनिधी

“अंजली दमानिया यांचा लोकशाहीच्या तीनही स्तंभांवर – न्यायपालिका, विधीमंडळ आणि कार्यपालिका – विश्वास उरलेला नाही. त्यामुळेच त्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर वारंवार टीका करत आहेत. मात्र त्यांच्या वक्तव्यांना आम्ही फारसं महत्त्व देत नाही,” अशा ठाम शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी अंजली दमानिया यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर दमानिया यांनी तीव्र शब्दांत टीका करत, “एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार?” असा सवाल उपस्थित केला होता. यावर प्रत्युत्तर देताना परांजपे म्हणाले, “लोकशाही पद्धतीने जनता निवडून देते, न्यायालय निर्णय देते आणि घटनात्मक प्रक्रिया मंत्री बनवते. पण दमानिया यांना या प्रक्रियेवरही विश्वास नाही, हे दुर्दैवी आहे.”

(हेही वाचा – IPL 2025 : ‘हा’ ६ फूट ८ इंच उंचीचा तेज गोलंदाज बंगळुरू संघाच्या ताफ्यात)

आनंद परांजपे यांनी यावेळी भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना येवला मतदारसंघातून मिळालेल्या भरघोस मताधिक्याची आठवण करून दिली. “जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि न्यायालयाने त्यांना महाराष्ट्र सदन प्रकरणात निर्दोष ठरवलं. मग यानंतरही कुणी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत असेल, तर तो लोकशाही व्यवस्थेवरच अविश्वास दाखवणारा प्रकार ठरतो,” असं परांजपे यांनी स्पष्ट केलं.

या टीका-प्रतिटिकांमुळे भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या पुनरागमनानंतर राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हं दिसत असून, अंजली दमानिया यांची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महायुती सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधकांचा रोष कायम असतानाच, आता भुजबळ समर्थकांनीही कडव्या शब्दांत प्रतिआक्रमण केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.