जामिनावर बाहेर पडलेल्या देशमुखांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीची कार्यकारिणी आर्थर रोड बाहेर हजर 

129

१०० कोटींच्या वसुलीच्या आरोपापाखाली मागील १४ महिन्यांपासून कारागृहात राहणारे अनिल देशमुख यांची बुधवार, २८ डिसेंबर रोजी जामिन्यावर सुटका झाली. आर्थर रोड येथून त्यांची सायंकाळी ५ वाजता सुटका झाली. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार  सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल अशी राष्ट्रीय कार्यकारिणी उपस्थित होती.

कारागृहाच्या बाहेर अनिल देशमुख येताच त्यांच्या गळ्यात फुलांचे हार घालण्यात आले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर प्रचंड गर्दी करून राष्ट्रवादीने शक्ती प्रदर्शन केले.

(हेही वाचा आता सुभाष देसाईंवर १२० कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप)

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. परमबीर सिंहांनी लेटर बॉम्ब टाकला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीनं देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीनं अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळं देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.