मलिकांच्या राजीनाम्यासाठी विधानभवनात आंदोलन!

78

देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर ९ मार्च या दिवशी सकाळी आंदोलन केले. या वेळी भाजपच्या आमदारांनी ‘नवाब मलिक यांना पाठीशी घालणार्‍या सरकारचा धिक्कार असो’, महाराष्ट्राचे सरकार दाऊद समर्थक आहे का?, नवाब मलिक यांचे त्यागपत्र घ्या, अन्यथा खुर्च्या खाली करा’, अशा आशयाच्या घोषणा दिल्या.

आंदोलनाच्या वेळी भाजपच्या आमदारांनी नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या विरोधातील फलक हातात घेतले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रवक्ते आणि अधिवक्ता आशिष शेलार, आमदार श्‍वेता महाले, आमदार नमिता मुदंडा यांसह भाजपचे सर्व आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.

आझाद मैदानात मोर्चा

यानंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने आझाद मैदानात ‘नवाब मलिक हटाओ, महाराष्ट्र बचाओ’, असा मोर्चा काढला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा इत्यादी उपस्थित होते.

(हेही वाचा जब तक मलिक का इस्तिफा नही आता है, हम न रुकनेवाले, न झुकनेवाले है!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.