Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार महाराष्ट्र दौरा, मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

77
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार महाराष्ट्र दौरा, मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. अशातच येत्या १७ सप्टेंबर रोजी अमित शहा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी पुणे दौरा केला होता. त्यानंतर आता ते मराठवाडा दौरा करणार आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ते मराठवाडा दौरा करणार आहेत.

यावेळी अमित शहा (Amit Shah) छत्रपती संभाजीनगरला देखील भेट देतील. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Bombay High Court : छत्रपती संभाजी नगर नामांतरावर ४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी)

मराठवाडा मुक्तिसंग्रामचं अमृत महोत्सवी वर्ष

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना देखील अमित शहा (Amit Shah) हजेरी लावतील. दरम्यान राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण वर्षभर मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

पुणे दौऱ्यानंतर मराठवाडा दौऱ्याचे आयोजन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील पुणे दौऱ्यावर होते. अमित शहा यांनी ५ आणि ६ ऑगस्ट रोजी पुणे दौरा केला होता. केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या पोर्टलच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी अमित शहा यांनी पुणे दौरा केला होता. त्यातच अवघ्या दोन महिन्यांमध्येच अमित शहा हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.