पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलली आहेत. सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याबरोबच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसाची वैधता समाप्त करण्यात आली आहे. या नागरिकांना 27 एप्रिलपूर्वी देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शुक्रवारी देशभरातील मुख्यमंत्र्यांना फोन करून महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
अमित शाह (Amit Shah) यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये पाकिस्तानी नागरिक आहेत. त्या प्रत्येकाचा शोध घेऊन त्यांना पाकिस्तानात परत पाठविण्यात यावे, अशा सूचना शहांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, असे शहांनी राज्यांना सतर्क केले आहे. (Amit Shah)
हेही वाचा- मुंबईत लवकरच Water Metro; दक्षिण मुंबईतून ४०-५० मिनिटांत वसई!
भारताकडून पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्यांना देश सोडण्यासाठी 27 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच विशेष व्हिसाअंतर्गत भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही 48 तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Amit Shah)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community