Modi Cabinet : श्रीकांत शिंदे मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाद; शिवसेनेतून कोण होणार मंत्री?

226
Modi Cabinet : श्रीकांत शिंदे मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाद; शिवसेनेतून कोण होणार मंत्री?
  • सुजित महामुलकर

शिवसेनेकडून (शिंदे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना मोदी सरकरमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची द्यावी अशी मागणी होत असली तरी श्रीकांत हे मंत्री होणार नाहीत, हे जवळपास निश्चित झाले आहे. तर एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव आणि मुंबईतील एक राज्य सभा खासदार मिलिंद देवरा किंवा मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. (Modi Cabinet)

प्रचंड उत्सुकता

लोकसभेत शिंदे यांची शिवसेना संपणार यासाठी देव पाण्यात ठेऊन बसलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांना विशेषतः शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला. शिंदे यांच्या शिवसेनेचे तब्बल सात खासदार लोकसभेत पोहोचले. उद्या, रविवारी ९ जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार. त्यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांची वर्णी लागणार याबाबत प्रचंड उत्सुकता महाविकास आघाडीतील नेत्यांसह शिवसेना उबाठा गटाला लागली आहे. (Modi Cabinet)

(हेही वाचा – Narendra Modi Oath Ceremony: बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे दिल्लीत आगमन)

मुंबईला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व

जाधव यांची खासदारकीची ही चौथी वेळ आहे. त्यामुळे ज्येष्ठ म्हणून त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडू शकते. तर मिलिंद देवरा हेदेखील याआधी दोनवेळा खासदार म्हणून लोकसभेवर गेले असल्याने तसेच त्यांना मंत्रीपदाचा अनुभव असल्याने त्यांची वर्णी लागू शकते. रवींद्र वायकर जरी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले असले तरी मुंबईतून ते एकमेव खासदार आहेत. आणि दोनपैकी मुंबईला केंद्रीय मंत्रिमंडळात एक तरी प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते. (Modi Cabinet)

घराणेशाहीचा शिक्का नको

श्रीकांत शिंदे यांची लोकसभा गटनेतेपदी तर श्रीरंग बारणे यांची प्रतोदपदी निवड झाली असल्याने मंत्रीपदाच्या शर्यतीतून हे दोन्ही खासदार बाद झाल्याची चिन्हे आहेत. तसेच सगळी पदे शिंदे यांनी घरात दिली तर घराणेशाहीचा एक वेगळा संदेश जनतेत जाऊ शकतो आणि त्याचा फटका आगामी विधानसभेत बसण्याची शक्यता लक्षात घेऊन श्रीकांत यांना मंत्री पदापासून दूर ठेवण्याची शक्यता एका खासदाराने बोलून दाखवली. (Modi Cabinet)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.