जनतेच्या पैशांवर सरकारचा उदोउदो – अजित पवार

144
जनतेच्या पैशांवर सरकारचा उदोउदो - अजित पवार

बदल्यांचे रेट ठरले आहेत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केला आहे. बदल्यासाठी रेट असा प्रकार महाराष्ट्रात कधीही घडलेला नव्हता. भ्रष्टाचारी कारभार राज्यात सुरू आहे. सर्व गोष्टी मंत्रालयातून हलत आहेत. जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी चालेली आहे. जनतेच्या पैशांवर यांचा उदोउदो कोण चालवून घेणार आहे? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी यांनी केला आहे.

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा सोमवारी मुंबईतील बीकेसी मैदानावर झाली या सभेमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, महागाई प्रचंड वाढली आहे. सारखं जाहिरातबाजी करतायत. बेस्टच्या बसेसला काय चिटकवलंय, त्यांच त्यांनाच माहित. त्यांचे फोटो कोणी बघतं नाही. पण बळजबरीने बघावे लागतायत. कारण लोकांच्या मनातलं सरकार नाहीये. हे दगा-फटका देऊन निर्माण झालेलं सरकार आहे. गद्दारी करून आलेलं सरकार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने अशाप्रकारी कधी गद्दारी सहन केलेली नाही, असं म्हणत अजित पवारांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

(हेही वाचा – Barsu Refinery: आता शरद पवारांना का भेटता? उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला सवाल

तसेच पुढे पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने या शिंदे-फडणवीस सरकारला नपूंसक म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने देशातील इतर कोणत्या राज्य सरकारला नपुंसक म्हटलं. याचीही यांना जनाची नाही, मनाची लाज वाटत नाही. राज्यात प्रक्षोभक भाषणं होत असताना, दंगली माजवण्याचा प्रयत्न होत असताना ते थांबवण्याची ताकद ज्या सरकारमध्ये नाही ते नपुंसक सरकार आहे अशी खरडपट्टी सर्वोच्च न्यायालयाने काढली. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा महाराष्ट्राचा कमीपणा नाही का? त्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही वाटत नाही का?

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.