Ajit Pawar : ‘भावी मुख्यमंत्री’ पदावरून अजित पवारांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान; म्हणाले …

हल्ली सोशल मीडियाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे आपल्याला खूप जागरूक राहावं लागणार आहे. विनाकारण आपल्याला कोणी टार्गेट करत असेल तर त्यांना उत्तरं द्या. वरिष्ठांच्या निरोपाची वाट पाहू नका.

169
Shiv Jayanti 2024 : जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करुया - उपमुख्यमंत्री अजित पवार
Shiv Jayanti 2024 : जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करुया - उपमुख्यमंत्री अजित पवार

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राज्यात ‘भावी मुख्यमंत्री’ हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्याचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत आहे. तसे जागोजागी बॅनर देखील लागलेले आपण पहिले. यामध्ये (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकर्ते देखील मागे नाहीत. मात्र आता अजित पवार यांनी या मुद्द्यावरून आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. “जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका. आधी संघटन बांधू, ते मजबूत करू” असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. (Ajit Pawar)

(हेही वाचा – CM Yogi Adityanath : आमचे संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी आहेत, मोगलांशी नाही)

नेमकं काय म्हणाले अजित पवार ?
“बाबांनो जरा कळ सोसा”

राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर (Ajit Pawar) बोलताना कार्यकर्त्यांनी थोडा धीर धरावा, “बाबांनो जरा कळ सोसा. धीर धरा. तुम्ही सारखे मुख्यमंत्रिपद, मुख्यमंत्रिपद म्हणता. असे करू नका. सर्वप्रथम आपली संघटना मजबूत करू. लोकांपर्यंत संघटना पोहोचवू. लोक आपल्याकडे येत आहेत. लोकांचा आपल्यावरील विश्वास वाढत आहे.”

चुकीचे आरोप करणाऱ्यांना उत्तरं द्या!

हल्ली सोशल मीडियाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळं आपल्याला खूप जागरूक राहावं लागणार आहे. विनाकारण आपल्याला कोणी टार्गेट करत असेल तर त्यांना उत्तरं द्या. वरिष्ठांच्या निरोपाची वाट पाहू नका. फक्त उत्तर देताना कोणाच्या भावना दुखावू नका, नवीन वाद निर्माण करू नका. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Nitin Gadkari: भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा)

आपली बदनामी होता कामा नये – अजित पवार

गटागटाचे राजकारण करू नका. प्रत्येकाला आपले विचार पटतीलच असं नाही. मात्र बहुमत जाणून घ्या, सर्वांच्या मतांचा विचार करूनच पुढं जायचं असतं. यालाच लोकशाही म्हणतात. महायुती सरकार नवं युवा धोरण आणणार आहे. या धोरणात नेमकं काय असावं याबाबत तुम्ही काही बाबी सुचवा. तुमच्या ही मतांचा आदर केला जाईल. आपली बदनामी होता कामा नये, याची काळजी घ्या. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Congress : ममता, नितीश यांच्यानंतर आता अरविंद केजरीवालांनीही काँग्रेसला धुडकावले )

तरुण कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला –

त्यासोबतच त्यांनी (Ajit Pawar) तरुणांना अनेक सल्लेदेखील दिले आहे. युवा कार्यकर्ता कसा असावा?, त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे?, यासंदर्भात त्यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की, युवकांचे हे वय महत्वाचे असते.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.