Ajit Pawar : राज्यात राजकीय भूकंप; राष्ट्रवादी फुटली; अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार

199

रविवार, २ जुलै महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा ठरला, सकाळी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांनी आमदारांची बैठक घेतली, त्यानंतर तडक राजभवनात पोहचले. तिथे शपथविधीच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली होती, त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार हे मंत्री मंडळात सहभागी होणार असल्याचे अधिकृत सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्याचे निश्चित झाले.

राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. राजभवनात अजित पवार आले, तेव्हा त्यांच्या सोबत २५ आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे समोर आले आहे. यामध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्या सारखे ज्येष्ठ नेते यांचा यात समावेश आहे.

(हेही वाचा Ajit Pawar : अजित पवार राजभवनात दाखल; विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार की मंत्रिपदाची शपथ घेणार?)

या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. आता अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ३० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.