निवृत्ती घ्या, नवं नेतृत्व तयार करा; Ajit Pawar यांनी नक्की कोणाला दिला सल्ला ?

62
निवृत्ती घ्या, नवं नेतृत्व तयार करा; Ajit Pawar यांनी नक्की कोणाला दिला सल्ला ?
  • प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना शिवसेना उबाठाचे माजी आमदार के. पी. पाटील यांना राजकीय निवृत्तीचा सल्ला देत जोरदार टोला लगावला आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील नागरी सत्काराच्या कार्यक्रमात पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, परंतु त्याआधीच अजित पवारांनी त्यांना खडेबोल सुनावले.

“८४ व्या वर्षी थांबा, नव्या नेतृत्वाला संधी द्या”

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “के. पी. पाटील, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तुम्ही ८४ वर्षांचे होणार आहात. आता कुठेतरी थांबायला हवं. निवृत्ती घ्या आणि नव्या नेतृत्वाला संधी द्या.” यापूर्वी अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर वयाचा मुद्दा उपस्थित करत राजकारणात निवृत्तीच्या वयाची चर्चा छेडली होती. त्यांनी म्हटले होते की, सरकारी नोकरीत ५८-६० व्या वर्षी निवृत्ती असते, मग राजकारणातही काही मर्यादा असायला हवी.

(हेही वाचा – Thackeray Vs Shinde : “शिवसेनेचे नवे बॅनर युद्ध!; ‘मैत्री वाघाशी’, शिवसेना उबाठावर थेट हल्ला”)

“मेहुणे-पाहुणे भांडणात काय अर्थ?”

अजित पवारांनी (Ajit Pawar) पाटील यांच्या कौटुंबिक आणि राजकीय वादांवरही भाष्य केले. “तुम्ही मेहुणे आणि पाहुणे मिळून सतत भांडत बसता, यात काही अर्थ नाही. कोणी तरी वेळीच माघार घेतली असती, तर आज चित्र वेगळं दिसलं असतं,” असा टोमणा त्यांनी मारला. पाटील यांच्या या भांडणांमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम झाल्याचा संदर्भ अजित पवारांनी दिला.

पाटलांचा पक्षप्रवेश रखडला?

के. पी. पाटील हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत होते, फक्त तारीख निश्चित होणं बाकी होतं. मात्र, अजित पवारांच्या या खड्या सल्ल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना ब्रेक लागला आहे. पाटील यांनी यापूर्वीही अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला होता, पण आता त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

(हेही वाचा – Pakistan च्या महिला पत्रकाराने दाखवली स्वतःची औकात; लंडनमधील हॉटेलमध्ये आई-बहिणीवरून दिल्या शिव्या )

राजकीय वर्तुळात चर्चा

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे ते नव्या नेतृत्वाला संधी देण्याची भाषा करत आहेत, तर दुसरीकडे स्वतःच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना टोमणे मारत असल्याचा आरोप होत आहे. पाटील यांच्यासारख्या नेत्यांना निवृत्तीचा सल्ला देताना अजित पवार स्वतःच्या गटातील राजकीय रणनीतीला धार देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.