अमित शहांच्या आधीच अजित डोभाल मुंबईत दाखल!

105

मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे, सर्वत्र उत्सवाचे, आनंदाचे वातावरण आहे, अशा वातावरणातही राजकीय गरमागरमीही पाहावयास मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या
दौ-यात ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर काही राजकीय बैठका घेणार आहेत. अशा प्रकारे अमित शहा यांच्या या दौ-याच्या आधीच देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान अजित डोभाल हे सुरक्षेचा आढावा घेणार, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

काय म्हणणे आहे तज्ज्ञांचे? 

अजित डोभाल हे मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. मुंबईत दहशतवादी कारवाया करण्याचा धमक्या मिळत आहेत, त्यासाठी अजित डोभाल सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत आले असावेत अशी चर्चा सुरु आहे. मात्र ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी ही शक्यता नाकारली आहे. भारतात दहशतवादी कारवाया पाकिस्तनच करत असतो आणि पाकिस्तान सध्या केवळ काश्मीर खोऱ्यातच ज्या काही कारवाया आहेत, त्या करत आहे. काश्मीरच्या पुढे येऊन देशात अन्यत्र कुठे कारवाया करण्याचे धाडस करणार नाही, मुंबईही दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता अजिबात नाही, त्यामुळे अजित डोभाल यांचा हा दौरा सामान्य आहे. तर माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या मते, सोमवार, ५ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याआधी मुंबईतील त्यांच्या सुरक्षेची काय तयारी आहे, याचा आढावा घेण्यासाठी डोभाल मुंबईत आले असावेत. मुंबईत जर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असेल, तर त्यासंबंधी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी अजित डोभाल यांना मुंबईत येण्याची गरज नाही, ते दिल्लीत बसूनही याचा आढावा घेऊ शकतात.

(हेही वाचा अजित डोभाल यांच्या मुंबई दौऱ्यामागील काय आहे कारण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.