House Arrest : उल्लू या ओटीटी अॅपवर (ullu OTT app) सध्या ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो चालू आहे. या शोचा पहिलावहिला एपिसोड प्रदर्शित होताच मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. या शोमधील काही दृश्य पाहून यात अश्लिलतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता याच शो संबंधी अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) यावर अश्लीलता पसरवल्या बद्दल नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसमध्ये खान आणि ज्या उल्लू ॲपवर हा शो प्रसारित झाला होता. त्या उल्लू ॲपच्या मालकाला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून त्यांचे जबाब नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (House Arrest)
(हेही वाचा – Batsman Using Phone : इंग्लिश काऊंटी स्पर्धेत फलंदाजाच्या खिशातून मोबाईल फोन पडल्यामुळे खळबळ)
दरम्यान या शोच्या विरोधात महिला आयोगाने देखील दाखल घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या की, शोमध्ये स्पर्धकांकडून विचारल्या जाणाऱ्या अश्लील प्रश्नांबद्दल अनेक महिलांनी तक्रार केली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या डीजीपींना कारवाई करण्याचे पत्र लिहिले आहे. तसेच या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, या शोबद्दल आम्हाला अनेक तक्रारी आल्या आहेत ज्यात असे म्हटले आहे की, शोमधील स्पर्धकांना अश्लील प्रश्न विचारले जातात आणि अशाच प्रकारच्या कृती करण्यास सांगितले जाते. आम्ही कारवाईसाठी डीजीपी कार्यालयाला पत्र लिहिले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – मुख्यमंत्री Devendra Fadnavis दिल्ली दौऱ्यावर; नेमकं काय कारण? वाचा)
चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांची अॅप बंद करण्याची मागणी
उल्लू अॅपवरील कंटेटवर भाजपाच्या विधानपरिषदेच्या चित्रा वाघ (Chitra wagh) आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आक्षेप नोंदवला होता. राज्यातील दोन्ही महिला नेत्यांनी उल्लू या अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान, महिला नेत्या आक्रमक झाल्यानंतर उल्लू अॅपने मोठा निर्णय घेतलाय. उल्लू अॅपने ‘हाऊस अरेस्ट’ या रिअॅपलिटी शोचा वादग्रस्त व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आहे. एजाज खान हा शो होस्ट करत आहे. अलीकडेच, या रिअॅपलिटी शोच्या एका भागात, स्पर्धक मुलींना त्यांचे कपडे काढण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना असे काही प्रश्न देखील विचारण्यात आले होते ज्यावर देशभरातून या शो वर सतत टीका होत होती आणि शोवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community