Ahmedabad Plane Crash दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाची पंतप्रधानांकडून विचारपूस ; रमेश विश्वकुमार म्हणाला, “मी विमानातून उडी घेतली नाही, तर…”

Ahmedabad Plane Crash दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाची पंतप्रधानांकडून विचारपूस ; रमेश विश्वकुमार म्हणाला, "मी विमानातून उडी घेतली नाही, तर..."

266
Ahmedabad Plane Crash दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाची पंतप्रधानांकडून विचारपूस ; रमेश विश्वकुमार म्हणाला,
Ahmedabad Plane Crash दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाची पंतप्रधानांकडून विचारपूस ; रमेश विश्वकुमार म्हणाला, "मी विमानातून उडी घेतली नाही, तर..."

गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) येथे काल (12 जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. (Ahmedabad Plane Crash)

“मी विमानातून उडी घेतली नाही…”
या अपघातात बचावलेला एक प्रवासी रमेश विश्वकुमार हे 40 वर्षांचे आहेत. त्यांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं की, “विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर 30 सेकंदात मोठा आवाज सुरु झाला अन् विमान क्रॅश झालं, हे खूप वेगानं घडलं. 11A सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती. एअर इंडियाच्या विमानाच्या पुढच्या भागात बिझनेस क्लास आहे. त्यानंतर इकॉनॉमी क्लासच्या सीट्स आहेत. मी विमानातून उडी घेतली नाही, तर मी सीटसह बाहेर फेकला गेलो.” अशी माहिती रमेश विश्वकुमार यांनी दिली. (Ahmedabad Plane Crash)

विमानतळावर उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळाची पाहणी केली असून या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर ते रुग्णालयात जाऊन जखमींना भेटले, त्यांच्याशी संवाद साधला. पाठोपाठ या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत विमानतळावर उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी या दुर्घटनेचा आढावा घेत आहेत. मोदी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत. (Ahmedabad Plane Crash)

सुरक्षा व्यवस्था कठोर
अहमदाबादमध्ये एअर इंडिया एआय-१७१ विमान अपघाताच्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी टीम ढिगाऱ्यांची तपासणी करणार आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी अनेक केंद्रीय एजन्सी सक्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे अपघातस्थळी, सिव्हील हॉस्पिटलमध्ये सुरक्षा कठोर करण्यात आली आहे. विशेष सुरक्षा गटाच्या (एसपीजी) सूचनेनुसार अहमदाबाद पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. अपघातामधील जखमींवर सी ७ इमारतीत उपचार सुरू आहेत, त्याभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिस कमिशनर जी. एस. मलिक उपस्थित आहे. (Ahmedabad Plane Crash)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.