
तीन दिवसांपूर्वी (12 जून) अहमदाबादमध्ये (Ahmedabad Plane Crash ) झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, डीएनए चाचणीद्वारे अधिकाऱ्यांनी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ३२ जणांची ओळख पटली आहे. दरम्यान, गुजरात सरकारने मृतदेह नातेवाईकांना देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (Ahmedabad Plane Crash )
Gandhinagar, Gujarat: CM Bhupendra Patel arrives at the residence of late former Chief Minister Vijay Rupani pic.twitter.com/P4e8yhajvj
— IANS (@ians_india) June 15, 2025
डॉ. पटेल यांनी सांगितले की, “आम्ही उर्वरित मृतदेहांचे नातेवाईक येण्याच्या प्रतिक्षेत आहोत. ते आल्यावर उरलेले मृतदेह त्यांच्याकडे सोपवले जातील. ओळख पटविण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.” विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याचे वृत्त गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिले. त्याचवेळी, गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल म्हणाले की, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाला सांगितले की त्यांचा डीएनए मॅच झाला आहे. राजकोटमधील अंत्यसंस्काराच्या पुढील प्रक्रियेत राज्य सरकार त्यांना सहकार्य करेल असेही मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला सांगितले आहे. (Ahmedabad Plane Crash )
वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून १९२ रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या
मृतदेह कधी घ्यायचे हे कुटुंबातील सदस्य ठरवतील. यापूर्वी, अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, पीडितांच्या कुटुंबियांशी समन्वय राखण्यासाठी २३० पथके तयार करण्यात आली आहेत. सुमारे एक हजार लोकांची टीम यासाठी तयार करण्यात आली आहे. सरकारने गुजरातच्या विविध जिल्ह्यांमधून रुग्णवाहिका मागवल्या आहेत. या कामासाठी एकूण १९२ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. (Ahmedabad Plane Crash )
१३ मृतदेह नातेवाईकांना सोपवले
एका रुग्णवाहिकेत चालकासह सहाय्यक कर्मचारी आहेत. सरकारने जाहीर केले आहे की सर्व मृतदेह नातेवाईकांच्या घरी पोहोचवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आतापर्यंत ३१ मृतदेहांचे डीएनए मॅच झाले आहेत. त्यापैकी १३ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात आले आहेत. (Ahmedabad Plane Crash )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community