निवडणूक निकालानंतर मोदी बॅकफ्रुटवर जातील; विरोधकांचा नेरेटिव्ह PM Narendra Modi यांनीच खोडून काढला

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जवळपास दोन तास 16 मिनिटे बोलले.

126
  • वंदना बर्वे
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत न मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संसदेत नमते घेतील, ते बॅकफ्रुटवर येतील, असा नेरेटिव्ह विरोधी पक्षांनी सेट केला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पाहिल्याच दिवशी विरोधक भलतेच आक्रमक झालेले दिसले. प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी वेगळेच चित्र दिसले. दोन्ही सभागृहांमध्ये पंतप्रधान मोदी यांची तशीच आक्रमकता होती, जशी 2014 आणि 2019 मधील निवडणूक जिंकल्यानंतर होती. पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांचा मनसुबा उधळवून लावला.
संसदेचे अधिवेशन संपले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकार आणि विरोधी पक्षात जोरदार चकमक बघायला मिळाली. दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी ओम बिर्ला आणि जगदीप धनखड यांनी गोंधळ घालणाऱ्यांवर कडक ताशेरे ओढले. यामुळे दोन्ही सभागृहातील राजकीय वातावरण तापले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनातील कामकाजाचा अजेंडा नक्कीच पूर्ण केला आहे. परंतु आठ दिवसांच्या अधिवेशनातच सरकार आणि विरोधक यांच्यातील आक्रामकपणाची धार दिसून आली. पुढील पाच वर्षांपर्यंत अशीच खडाजंगी बघायला मिळू शकते जशी अधिवेशनात पहिल्या दिवशी पाहायला मिळाली.
18 व्या लोकसभेत रालोआला पूर्ण बहुमत मिळाले असले तरी भाजप खासदारांची संख्या 240 एवढीच आहे. तर, कॉग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांची संख्या वाढली आहे. एकट्या कॉग्रेसचे 98 खासदार अहेत. तर समाजवादी पक्ष आणि तृणमूल कॉग्रेसची संख्या सुध्दा वाढली आहे. निकालाच्या आकडेवारीवरून सत्ताधारी पक्ष थोडा कमकुवत झाला आणि विरोधक थोडे शक्तीशाली झाले असे दिसून येते. मात्र, प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आक्रामकता किंचितही कमी झाल्याचे दिसून येत नाही.
सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या रालोआ सरकारला आपल्या कमजोरीचा फायदा कॉग्रेससह विरोधी पक्षांना घेवू द्यायचा नाही असे दिसून येत आहे. सत्तापक्ष आणि विरोधक यांच्यातील या मानसिक राजकीय युद्धाची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यातील उघड शब्दांच्या बाचाबाचीत स्पष्टपणे दिसून आली.

ओम बिर्ला आणि जगदीप धनखड आक्रमक 

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सर्वोच्च पीठासीन अधिकारी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहाच्या कामकाजाच्या व्यवस्थेवरून राजकीय वातावरण तापले. भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी याचा परिणाम पंतप्रधानांच्या आक्रमकपणावर जराही झालेला नाही हे अनेक गोष्टींवरून दिसून येते. लोकसभेत हंगामी अध्यक्षाच्या निवडीपासून ते मंत्रीमंडळाच्या खातेवाटपापर्यंत सर्व गोष्टी भाजपच्या आक्रामकपणाची स्पष्टता जाणवून देणारी आहे.

हंगामी अध्यक्ष

लोकसभेचा हंगामी अध्यक्ष सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या खासदाराला बनविण्यात येते. परंतु, 18 व्या लोकसभेत ही परंपरा मोडीत निघाली. काँग्रेसचे के. सुरेश आठ वेळा निवडून आलेले असतानाही भाजपने सात वेळा निवडून आलेले भतृहरी मेहताब यांना हंगामी अध्यक्ष बनविण्यात आले.

 उपाध्यक्ष सुध्दा रालोआचाच होणार

परंपरेनुसार काँग्रेसने विरोधी पक्ष इंडी आघाडीकडे उपसभापतीपदाची मागणी केली. परंतु सरकारने ती सुध्दा नाकारली. त्याचा परिणाम असा झाला की, तब्बल पाच दशकांनंतर पहिल्यांदाच सभापतीपदाची निवडणूक झाली. सभापती निवडीवरून सुरू झालेला हा तणाव ओम बिर्ला यांच्या निवडीनंतर लगेचच दिसून आला. संसदेत नवीन अध्यक्षाची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्याची परंपरा आहे. परंतु, सरकारच नव्हे तर विरोधी पक्षनेत्यांनीही सभापतींकडे दुर्लक्ष केले नाही.

विरोधकांच्या गोंगाटाच्या विरोधात आंदोलन आणले

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जवळपास दोन तास 16 मिनिटे बोलले. आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुध्दा दोन तास 16 मिनिटे जोरदार घोषणाबाजी केली. एरवी 15 – 20 मिनिटे घोषणाबाजी करून विरोधक सभागृहातून बाहेर पडायचे. परंतु यावेळेस ते मोदी यांचे भाषण संपत नाही तोपर्यंत जोरदार घोषणाबाजी करीत राहिलेत. विरोधकांना आपल्या संख्याबळाच्या जोरावर सभागृहात लवचिकता अपेक्षित होती, पण दुसऱ्याच क्षणी सभापतींनी आणीबाणीचा स्वतःचा प्रस्ताव आणून सर्वांन आश्चर्यचकित केले. यानंतर लोकसभेत शेवटच्या दिवशी पंतप्रधानांच्या उत्तरानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांच्या गोंगाटाच्या विरोधात ठरावही मंजूर केला.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावावर सुरू केलेल्या चर्चेदरम्यान पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष आणि सभापती यांच्यातील अविश्वासाची दरी आणखी मोठी झाली असल्यचे दिसून आले. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदी निवडून आलेल्या बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींसोबत आणि त्यांच्यासोबत हस्तांदोलन कशाप्रकारे केले हे सांगितले.

आभार प्रदर्शनादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक हल्ले 

राहुल गांधींच्या वक्तव्याने अस्वस्थ झालेल्या बिर्ला यांनीही पंतप्रधानांच्या भाषणाला उत्तर देताना संधी मिळताच सभागृहात विरोधी पक्षाला चोख प्रत्यूत्तर दिले. आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्याच भाषणात हिंदूंना हिंसक म्हणत त्याचा संबंध भाजप-संघाशी जोडत नव्या वादाला तोंड फोडले.

राहुल गांधी यांनी अ-जैविक आणि देवाशी थेट संवाद साधणारे असे टोमणे मारून पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याची एकही संधी सोडली नाही. या दरम्यान सभागृहात अर्धा डझन केंद्रीय मंत्री आणि संपूर्ण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुमारे दोन तास खडाजंगी सुरू होती. पंतप्रधानांनी सुध्दा बालकबुध्दीपासून ते शोले चित्रपटातील मौसीचे उदाहरण देवून हिशेब बरोबर केला.

विरोधकांनी सर्व कामकाज तहकूब करून नीटवर चर्चा घेण्याची लेखी मागणी केली. परंतु लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनीही मागणी नामंजूर केली. यामुळे विरोधक नाराज झाले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. एका दिवसासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. लोकसभेच्या बदललेल्या चित्राची पुनरावृत्ती राज्यसभेतही दिसून आली. आक्रमक विरोधक आपल्या मागण्यांवरून मागे हटायला तयार नव्हते तर दुसरीकडे सरकार विरोधकांच्या दबावाला बळी पडणार नाही हे दाखविण्यासाठी कामकाजाची नियमावली वारंवार वाचून दाखविली. दोन्ही बाजूंच्या या राजकीय लढतीत सभापती धनखड यांच्या भूमिकेवर विरोधी पक्षांनी धारदार बाण सोडले.

धनखड आणि खरगे यांच्यात जोरदार वादावादी 

सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नेहमीच सरकारची बाजू घेतल्याचा आरोप केला. अशातच संधी मिळताच धनखड यांनीही एक दिवस खरगे यांच्यावर निशाणा साधला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संविधानाचा आधार घेत संपूर्ण विरोधकांच्या वर्तनाला अशोभनीय आणि दुःखद ठरवण्यात त्यांनी जराही वेळ घालवला नाही.

इतकेच नाही तर अधिवेशन संपल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू आणि काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी एकमेकांना दिलेले सल्ले आणि इशारे हे स्पष्टपणे दर्शवतात की, पहिल्याच अधिवेशनात सुरू झालेला हा वाद पुढील पाच वर्षात आणखी उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही. अशात, संसदेच्या आगामी अधिवेशनात सरकार आणि विरोधकांची आक्रमकता कोणते स्वरूप धारण करते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.