‘ऑपरेशन सिंदूर’नंतर PM Narendra Modi पोहोचले आदमपूर एअरबेसवर; जवानांशी साधला संवाद

63
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान Narendra Modi पोहोचले आदमपूर एअरबेसवर; जवानांशी साधला संवाद
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान Narendra Modi पोहोचले आदमपूर एअरबेसवर; जवानांशी साधला संवाद

Narendra Modi : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये पहेलगाम येथे अतिरेकी हल्ला केला. त्यावेळी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून हिंदू असल्याचे समजल्यावरच त्यांना ठार केले. त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. दरम्यान ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मेला रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३ मेला सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी असलेल्या जवानांशी संवाद साधला. यावेळी हवाई दलाच्या जवानांनी सद्यस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. या दौऱ्याचे अनेक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर (Adampur Airbase) जाऊन पाकिस्तानसह जगाला एक संदेश दिला की, संपूर्ण देश सैनिकांसोबत आहे. (Narendra Modi)

(हेही वाचा – ठाकरे गटाला धक्का: Tejasvee Ghosalkar यांचा शिवसेनेतून राजीनामा, दहिसरमध्ये बंडखोरी!)

पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेसवर झाला होता हवाई हल्ल्याचा प्रयत्न

आदमपूर एअरबेस देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एअरबेस आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूर एअरबेस चर्चेत आले होते. पाकिस्तानकडून या एअरबेसवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. भारतीय हवाई दलाच्या जवानांनी हा हल्ला निकामी केला. पाकिस्तानकडून 10 मे रोजी ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे या एअरबेसवर हल्ला झाला होता. परंतु तो परतवून लावत भारताने पाकिस्तानच्या अनेक सैनिक ठिकाणांवर हल्ले केले. त्यामुळे या एअरबेसवरील जवानांची नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या संदर्भातील काही फोटो ‘एक्स’ वर शेअर करण्यात आले आहे. त्यात नरेंद्र मोदी यांनी लिहिली की, ‘मी सकाळी आदमपूर एअरबेसवर गेलो. त्या ठिकाणी हवाई दलातील सैनिकांची भेट घेतली. त्यांचे धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयता याला सॅल्यूट केले. त्यांच्यासोबत राहण्याचा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे त्याबद्दल भारत त्यांचा सदैव ऋणी राहील.’

(हेही वाचा – J&K terrorist encounter: ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमक, १ दहशतवादी ठार)

यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर”द्वारे पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

हेही पहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.