राज ठाकरेंनी शिवसेनेला केले मंदिराबाहेर उभे

113

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या एका इशाऱ्यानंतर त्यांचे पडसाद महाराष्ट्रभर आणि देशाच्या कानाकोपऱ्यात उमटायचे. बाळासाहेबांनंतर ही ताकद आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये असून मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदीबाहेर हनुमान चालिसा ऐकवली जाईल,असा इशारा दिल्यानंतर याचे पडसाद राज्यासह देशात उमटले. आणि कधीही हनुमान जयंतीला मंदिराबाहेर महाआरती न करणाऱ्या शिवसेनेलाही मंदिराबाहेर उभे होत महाआरती करण्याची वेळ आली आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेसह सर्वच पक्षांना हनुमानजी आठवले आणि कुणाला शोभयात्रा काढत तर कुणाला हनुमान चालिसा, महाआरती करत राज ठाकरेंच्या मुद्दयाचे अप्रत्यक्ष समर्थन करावे लागले.

३ मेपर्यंतची मुदत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्याच्या सभेत आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेत धर्म आपल्या घरी ठेवा,असे सांगत लोकांना आवाजाचा त्रास होत असलेले मशिदींवरील भोंगे उतरवा, नाहीतर मशिदींसमोर हनुमान चालिसा ऐकवली जाईल, असा इशारा दिला होता. यानंतर त्यांनी ३ मेपर्यंतची मुदत दिली असून त्यानंतर आम्ही दाखवू,असे म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या ज्वलंत हिंदुत्वाच्या पुरस्कार करणाऱ्या भूमिकेचे स्वागत होण्याऐवजी भाजपची बी टिम म्हणून टीका करण्यात आली.

हनुमानाची आठवण करून दिली

परंतु राज् ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर मशिदींवरील भोंग्यांचा विषय चर्चेत आला असून त्यांनी भोंग्याबरोबरच राम भक्त हनुमानचीही आठवण करून दिली. त्यामुळे शनिवारी होत असलेल्या हनुमान जयंतीच्या दिवशी नाशिकमधील हनुमान मंदिरात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचे पठन होत आहे. तर यानंतर शिवसेनेचे दादरमधील विभागप्रमुख व आमदार सदा सरवणकर यांनी दादर कबुतर खाना येथील पुरातन वटवृक्ष मंदिरात सायंकाळी महाआरती करण्याचे जाहीर केले. शिवसेनेच्यावतीने या मंदिरात महाआरती होणार आहे. त्याआधी दुपारी मनसेच्यावतीने आगार बाजार येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठन झाले. परंतु राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुस्लिम समाजाला भोंग्याचा इशारा दिला असला तरी इतर राजकीय समाजाला हनुमान चालिसामुळे हनुमानाची आठवण करून दिली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वामुळे शिवसेनेला हनुमान जयंतीच्यादिवशी महाआरती करण्यासाठी रस्त्यावर उतरुन आमचे हिंदुत्व अजूनही जिवंत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांच्यामुळे शिवसेनेला मंदिराबाहेर उभे राहावे लागले,असे चित्र दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.