MVA च्या बैठकीत वंचित आघाडीचा अपमान; डॉ. धैर्यशील पुंडकर बैठक अर्धवट सोडून बाहेर

या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याबाबत चर्चा सुरु झाली. या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला दिले होते. त्यानुसार बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉ. धैर्यशील पुंडकर हजर राहिले. पण बैठक अपूर्ण असतानाच ते बाहेर पडले. आमचा बैठकीत अपमान झाला, अशी प्रतिक्रिया पुंडकर यांनी प्रसारमाध्यमांना बैठकीतून बाहेर पडल्यानंतर दिली.

208
MVA च्या बैठकीत वंचित आघाडीचा अपमान; डॉ. धैर्यशील पुंडकर बैठक अर्धवट सोडून बाहेर

महाविकास आघाडी (MVA) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातले वाद बैठकीच्या दिवशीही संपायला तयार नाहीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत (MVA) जाण्याची उत्सुकता दाखवत असताना प्रत्यक्ष महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित आघाडीचा अपमान करण्यात आल्याची तक्रार करत वंचितचे प्रतिनिधी डॉ. धैर्यशील पुंडकर महाविकास आघाडीची बैठक अर्धवट सोडून बाहेर निघून आले आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित आघाडीचा अपमान झाल्याची तक्रार केली. (MVA)

महाविकास आघाडीची (MVA) मंगळवारी (३० जानेवारी) हॉटेल ट्रायडेंट येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याबाबत चर्चा सुरु झाली. या बैठकीचे निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला दिले होते. त्यानुसार बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॉ. धैर्यशील पुंडकर हजर राहिले. पण बैठक अपूर्ण असतानाच ते बाहेर पडले. आमचा बैठकीत अपमान झाला, अशी प्रतिक्रिया पुंडकर यांनी प्रसारमाध्यमांना बैठकीतून बाहेर पडल्यानंतर दिली. (MVA)

डॉ. धैर्यशील पुंडकर म्हणाले…

जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चेसाठी गेल्यानंतर तिथे आम्हाला तुम्ही बाहेर थांबा असं सांगितले. त्यानंतर आम्हाला तब्बल एक तास बाहेर ठेवले. आम्ही महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहोत की नाही? (MVA)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि ओबीसींच्या (OBC) आंदोलनाबाबत भूमिका घ्या, संदिग्ध राहू नका. तुमचा काही फॉर्म्युला ठरला असेल तर तो फॉर्म्युला आम्हाला सांगा. पण त्यांचे आपापसात काही ठरलेलं नाही. त्यांचा आपापसांत ताळमेळ नाही. त्यांचेच काही ठरले नसल्यामुळे त्यांनी आम्हाला काही सांगितलेच नाही. आम्ही सुरुवातीला एक-दीड तास बैठकीला बसलो. आम्ही त्यांना सांगितलं की या-या विषयांवर तुम्ही भूमिका मांडा, तसेच महाविकास आघाडीमध्ये (MVA) आधी आम्हाला घ्या. आम्हाला तसे पत्र द्या. त्यावर त्यांचे म्हणणे आहे की आम्ही विचार करतो. पण तेव्हापासून आम्ही बाहेर बसलो आहोत. (MVA)

(हेही वाचा – CRIME POST: मुंबईत अंमली पदार्थांच्या धंद्यात नायजेरियन्सचा मोठ्या प्रमाणात समावेश)

महाविकास आघाडीकडे (MVA) वंचितने जागा मागितल्या नाहीत. त्यांच्याकडून फॉर्म्युला मागितला आहे. तुमचे ठरल्यानंतर आम्हाला सांगा. त्यानंतर आम्ही बोलू. आम्ही बैठकीच्या बाहेर असल्यामुळे त्यांना जातो असे सांगून आलेलो नाही. पण ही वागणूक योग्य नाही. त्यांच्याकडून अपमानास्पदच वागणूक मिळाली आहे म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे. आम्ही निर्णय घ्यायला सक्षम आहोत. आम्ही वर्षानुवर्षे रस्त्यावर भांडणारे लोकं आहोत. चर्चेची दारे बंद झाली असं आम्ही म्हणत नाहीत. आम्ही पक्षस्तरावर चर्चा करु. जागा वाटपाचा त्यांनी त्यांचा फॉर्म्युला ठरला असेल तर सांगावा, नसेल तर आमचा १२-१२-१२-१२ चा फॉर्म्युला मान्य करावा. त्यांचंच ठरत नाही. त्यांच्यात भांडणं सुरु आहे. आपल्याला कुणी कशी वागणूक दिली तर त्याबाबत पक्षस्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल. (MVA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.