नुसते पुतळे नको छत्रपतींचे चारित्र्य अंगिकारा – नितीन गडकरी

126
नुसते पुतळे नको छत्रपतींचे चारित्र्य अंगिकारा - नितीन गडकरी
नुसते पुतळे नको छत्रपतींचे चारित्र्य अंगिकारा - नितीन गडकरी

छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा, पिता व शासक होते. रामराज्या इतकीच शिवशाही प्रचलित आहे. पुतळा उभा केल्यानंतर त्यांचे विचार आणि कार्याच्या अनुरूप आपले चरित्र, चारित्र्य आणि व्यवहार हवा. तो तसा नसेल तर नुसते पुतळे उभारून काही उपयोग होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा उभारणीचे भूमिपूजन रविवारी, १९ जून रोजी नागपूर विद्यापीठ परिसरात नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला श्रीमंत मुधोजी राजे भोसले, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी, तंजावरचे प्रिंस शिवाजी राजे भोसले, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गडकरी म्हणाले की, नागपूर विद्यापीठात ऑडिटोरियम आणि कन्व्हेंशन सेंटर बांधायचे ठरवले आहे. ऑॅडिटोरियममध्ये लाईट अँड साऊंड शो करता येईल का याचे प्रयत्न करू. महापुरूषांचा इतिहास आणि चरित्र नव्या पिढीसमोर नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून नेले पाहिजे. ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त यांची तुकडोजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट काढायची इच्छा अपूर्ण राहिली. लोकसहभागातून पुतळा उभारणे ही खूपच चांगली गोष्ट आहे.

(हेही वाचा – कर्नाटकमध्ये अभ्यासक्रमातून वीर सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध करतोच; उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना उत्तर)

सरकारकडे पैसे मागितले नाही हे चांगले झाले. कारण फुकटात दिलेल्या गोष्टींची लोकांना किंमत राहत नाही. प्रत्येक गोष्टींची थोडी ना थोडी किंमत पडली पाहिजे. सामान्य माणसाचे ११ ते ५१ रुपये मिळाले तरी चालेल असे गडकरी यांनी सांगितले. यावेळी नितीन गडकरी यांनी वैयक्तिक ५ लाखांची देणगी जाहीर केली. यावेळी बोलताना तंजावरचे प्रिंस शिवाजी राजे भोसले यांनी तंजावरला मोडी लिपीत १५ लाख कागदावर दैनंदिनी लिहून ठेवली आहे. त्याचा अभ्यास प्रकाशित केला तर मराठ्यांचा अप्रकाशित इतिहास उजेडात येईल असा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.