“मिठी नदीत गाळ की काळा पैसा?” – शिवसेनेची व्यंगचित्रातून Aditya Thackeray यांच्यावर चौफेर फटकेबाजी!

95
"मिठी नदीत गाळ की काळा पैसा?" – शिवसेनेची व्यंगचित्रातून Aditya Thackeray यांच्यावर चौफेर फटकेबाजी!
  • प्रतिनिधी

मिठी नदीतील गाळ उपसा घोटाळ्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणाचा धागा पकडून शिवसेनेने थेट व्यंगचित्राच्या माध्यमातून युवानेते आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) जोरदार हल्ला चढवला आहे. शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या व्यंगचित्रामुळे शिवसेना उबाठा आणि बॉलिवूड संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मुंबई महापालिकेच्या मिठी नदी गाळ उपसा कामांमध्ये ६५ कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असून, बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि त्यांचे बंधू सँतिनो मोरिया यांची नावे या चौकशीत सातत्याने पुढे येत आहेत. विशेष म्हणजे, या कामांचा कालावधी आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) शिवसेना उबाठाच्या महापालिकेवरील सत्ताकाळातील आहे.

(हेही वाचा – Covid संदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना जारी केले आदेश)

शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात मिठी नदी एक तिजोरी दाखवली असून, तिच्यातून एक उंदीर पैसे चोरण्याच्या हालचाली करत आहे. हे पैसे तो ‘मातोश्री-२’ नावाच्या बॅगेत टाकताना दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या उंदराला युवानेते आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) चेहरा लावून त्यांच्या कथित सहभागावर थेट बोट ठेवण्यात आले आहे. हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्यंगचित्रातून केवळ आदित्य ठाकरेच (Aditya Thackeray) नव्हे, तर त्यांच्या बॉलिवूडशी असलेल्या जवळच्या संबंधांवरही टोला लगावण्यात आला आहे. या प्रकरणावरून ठाकरेंच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, दिनो मोरिया यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून आधीच तीन वेळा चौकशी करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असून, याप्रकरणात आणखी काही मोठी नावे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिठी नदीच्या तळाशी नेमकं काय दडले आहे – गाळ, गैरव्यवहार की गूढ संबंध?

याचे उत्तर पुढील तपासात स्पष्ट होईल, पण शिवसेनेच्या या व्यंगचित्रामुळे राजकारणात नवा तिढा निर्माण झाला आहे हे मात्र निश्चित!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.