Aaditya Thackeray यांनी रात्री पोस्ट केली अन् अंगलट आली

338
Aaditya Thackeray यांनी रात्री पोस्ट केली अन् अंगलट आली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई-पुण्यातील पहिल्या पावसात ठिकठिकाणी पाणी साचले आणि याचे खापर एकनाथ शिंदे सरकारवर फोडले. मराठी भाषेतील पोस्टवर लोक वाईट शब्दांत अब्रू काढत असल्याने ठाकरे यांनी ‘X’वर रात्री १.३८ वाजता इंग्रजी भाषेत पोस्ट टाकली आणि व्हायचं तेच झालं, नेटकऱ्यांनी त्यांना त्यांच्याच शब्दांत पकडून प्रतिप्रश्न करून हैराण केले. (Aaditya Thackeray)

… म्हणून रात्री लगोलग पोस्ट

‘रात्रीस खेळ चाले’ तसं पहिल्या पावसात मुंबई-पुण्यात कसे पाणी भरले याची घाई-घाईत रविवारिच (९ जून) रात्री दीड वाजता पोस्ट टाकली. याचे कारण सकाळपर्यंत पावसाचे पाणी ओसरणार याची कल्पना त्यांना आहे. गेली ३ दशकं मुंबई महापालिकेत सत्ता असताना पहिल्या पावसात पाणी साचतेच यांची माहिती आदित्य ठाकरे यांना आहे. आणि ही टीका करण्याची वेळ चुकू नये यासाठीच सकाळपर्यंत वाट न पाहता पाणी ओसरण्याआधी, रात्री लगोलग पोस्ट करून मोकळे व्हावे, हा विचारही त्यांनी केला असावा. (Aaditya Thackeray)

(हेही वाचा – Modi 3.0: पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारताच मोदींचे शेतकऱ्यांना खास गिफ्ट!)
माहितीचा उपयोग टीका करण्यासाठी

पहिल्या पावसात रस्त्यावरील आणि रस्त्याकडेची धूळ, माती, झाडाची पाने असे सर्व पावसाच्या पाण्याने वाहत जाऊन पर्जन्य जलवाहिन्यांच्या तोंडाशी अडकते आणि पाण्याचा निचरा लवकर होत नाही, हे त्यामागचे कारण. अनेक वर्षे ते याबाबत स्पष्टीकरण देत असत आणि आता या माहितीचा उपयोग त्यांनी वेळ (रात्रीची) साधून टीका करण्यासाठी केला. आदित्य ठाकरे यांनी इंग्रजीत केलेल्या टीकेला नेटकऱ्यांनी इंग्रजीतच प्रतिप्रश्न करून भंडावून सोडले. (Aaditya Thackeray)

‘मोदी पुन्हा आले, म्हणून रात्रीची झोप उडाली’

मुंबई महापालिकेत १९८५ पासून मध्ये चार वर्षे (१९९२-१९९६) सोडले तर तत्कालीन शिवसेना पक्ष सत्तेत आहे. याचा संदर्भ देत नेटकऱ्यांनी ठाकरेंना प्रश्न केला की, तुम्ही इतका काळ सत्तेत होता तेव्हा का उपाययोजना केल्या नाहीत? तर एका नेटकऱ्याने तर, “तुम्ही डायपरमध्ये होता तेव्हापासून महापालिकेत शिवसेना सत्तेत आहे, त्यामुळे खरं तर तुमचा प्रश्न तुमच्या वाडिलांसाठी आहे..” अशी प्रतिक्रिया लिहिली. एकाने तर ‘उपाययोजना सुचवा, राजकारण करू नका’ असा सल्ला दिला. एकाने तर ‘मोदी पुन्हा आले म्हणून रात्रीची झोप उडाली..’ असा टोमणा मारला. ‘गेले कित्तेक दशकं आम्ही हे बघत आहोत, कोल्हेकुई करून काय उपयोग’ असे सुनावले. (Aaditya Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.