Deepak Kesarkar : युती तोडण्यामध्ये आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा; दीपक केसरकरांचा आरोप

186

शिवसेना-भाजप युती तोडण्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा मोठा वाटा असल्याचा आराेप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला. शिवसंकल्प अभियान तयारीसाठी दीपक केसरकर हे कोल्हापुरात आले असता ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

ज्या मतदारसंघातून ज्या पक्षाचा खासदार निवडून आला आहे, त्यालाच त्या मतदार संघात उमेदवारी दिली जाते. त्याप्रमाणे कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघ आमच्याकडे राहतील. परंतू याचा अंतिम निर्णय मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर होईल. कोल्हापुरात होणाऱ्या अभियानासाठी शिवसेनेचे राज्यभरातील प्रतिनिधी येणार आहेत. तसेच कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी स्वतंत्र जाहीर सभा होणार आहे. मात्र लोकसभेचे अधिवेशन असल्याने नेमकी तारीख निश्चित झाली नाही, असेही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.