प्रतिनिधी
Aditi Tatkare : राज्यातील बालविवाह रोखण्यासाठी तालुकास्तरावर माध्यमिका शाळांमध्ये ‘बालिका पंचायत’ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare यांनी दिली. स्थलांतरित मजूर आणि कामगार समुदायांमध्ये बालविवाहाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून बालविवाह रोखण्यासाठी तालुकास्तरावर माध्यमिक शाळांमध्ये ‘बालिका पंचायत’ सुरू करण्याचे निर्देश दिले. यामुळे मुली आपल्या समस्या मांडू शकतील आणि बालविवाहाला आळा बसेल. तसेच, बालकांसाठीच्या योजनांची माहिती मुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पंचायत प्रभावी ठरेल, असे तटकरे यांनी सांगितले.
(हेही वाचा IMD Monsoon Update : राज्यातील विविध भागांत यलो तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी )
मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी बालविवाह, बाल संगोपन योजना, विधवा महिलांच्या कृती दल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला. आयुक्त नयना मुंडे, उपायुक्त राहूल मोरे, उपसचिव भोंडवे आणि कुलकर्णी उपस्थित होते. मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “बालविवाहमुक्त महाराष्ट्रासाठी जनजागृती मोहीम राबवावी. बालविवाहास उपस्थित राहणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.” राज्यातील ४६८ बालसंगोपन केंद्रांतील १.१० लाख मुलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेचे प्रलंबित लाभ तातडीने द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले. स्वयंसेवी संस्थांनी गृहभेटींचे अहवाल सादर करावेत, असेही त्या म्हणाल्या.
एकल आणि विधवा महिलांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांसाठीच्या योजना सर्व विधवांना लागू कराव्यात, असेही त्या म्हणाल्या. मानखुर्द येथील द चिल्ड्रन एड सोसायटीच्या डागडुजी आणि संरक्षण भिंतींचे काम गतीने करावे, तसेच दिव्यांग बालगृहाचे बांधकाम परिपूर्ण सुविधांसह पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी हेल्प डेस्क आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम राबवण्याच्या सूचनाही मंत्री तटकरेंनी दिल्या.Aditi Tatkare
Join Our WhatsApp Community