Yogi Adityanath : आतंकवादाचे समर्थन खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री योगींचा इशारा

131
Yogi Adityanath : आतंकवादाचे समर्थन खपवून घेणार नाही - मुख्यमंत्री योगींचा इशारा

पश्चिम आशियात सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात (Yogi Adityanath) भारताने जाहीरपणे इस्त्रायलला आपले समर्थन दिले. त्यानंतर विरोधकांकडून अनेक ठिकाणी पॅलेस्टाईनचे, हमासचे समर्थन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेनुसार उत्तर प्रदेशमध्ये पॅलेस्टाईनचे (Israel Palestine Conflict) म्हणजेच आतंकवादाचे समर्थन करू नये, असे केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत आतंकवादाचे समर्थन खपवून घेतले जाणार नाही. असे आदेश योगी यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी काल म्हणजेच १२ ऑक्टोबर गुरुवारी आपल्या राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना वरील आदेश दिले आहेत.

योगी (Yogi Adityanath) यांच्या लखनौ येथील निवासस्थानी त्यांच्याचा अध्यक्षतेखाली झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेणाऱ्या बैठकीत त्यांनी सांगितले की, “इस्त्रायल आणि हमास या मुद्द्यावर भारत सरकारच्या दृष्टिकोनाच्या विरुद्ध कोणतीही कृती स्वीकारली जाणार नाही.”

(हेही वाचा – Operation Ajay : एकूण २१२ जणांची पहिली तुकडी भारतात दाखल)

सोशल मीडियावर असो किंवा कोणत्याही धार्मिक स्थळावर कोणीही वादग्रस्त विधान करू नये आणि जर कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी (Yogi Adityanath) दिले आहेत, असे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस आणि प्रशासकीय प्रमुखांना स्थानिक आणि धार्मिक नेत्यांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी अलिगढच्या मुस्लिम विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ कॅम्पसमध्ये मोर्चा काढला होता. त्या चार विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी हे निर्देश दिले आहेत. कॅम्पसमध्ये पॅलेस्टाईन समर्थक मोर्चाला आक्षेप घेत राजकीय नेत्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. एएमयूने असेही म्हटले आहे की त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.